Thur, June 1, 2023

जेष्ठांच्या स्पर्धेत बकरे , जोशी यांना पदके
जेष्ठांच्या स्पर्धेत बकरे , जोशी यांना पदके
Published on : 10 March 2023, 4:00 am
88269
ज्येष्ठांच्या जागतिक स्पर्धेत
बाकरे, जोशी यांना पदके
कोल्हापूर, ता. १० : मस्कत येथे झालेल्या विसाव्या वर्ल्ड व्हेटरन टेबल टेनिस चम्पियनशिप स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पंचवीस पदके पटकावली. या चमूमध्ये कोल्हापूरच्या दोन महिला खेळाडूंचा समावेश होता. स्पर्धेत सुहासिनी बाकरे यांनी ६० ते ६४ वयोगटांमध्ये एकेरीत रौप्य तर दुहेरीमध्ये तीन कांस्यपदके पटकावली. शिल्पा जोशी यांनी पन्नास ते चौपन्न वर्षे वयोगटात खेळताना महिला एकेरीत रौप्य, महिला दुहेरी व मिश्र या दोन्ही प्रकारात कास्यपदक पटकावले. स्पर्धेत भारतीय चमूने सहा सुवर्ण, सहा रौप्य व तेरा कांस्यपदके पटकावली आहेत. दरम्यान, शासनाने या ज्येष्ठ खेळाडूंचा उचित सन्मान करावा, अशी मागणी आता होत आहे.