बालगोपाल ची उत्तरेश्वर तालीम वर मात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालगोपाल ची उत्तरेश्वर तालीम वर मात
बालगोपाल ची उत्तरेश्वर तालीम वर मात

बालगोपाल ची उत्तरेश्वर तालीम वर मात

sakal_logo
By

88278
महापालिका चषक फुटबॉल स्पर्धा; सुरुवातीचा काहीवेळ खेळ संथगतीने

बालगोपाल तालीम मंडळाची
उत्तरेश्वर तालीम मंडळावर मात

कोल्हापूर, ता. १० ः महापालिका चषक फुटबॉल स्पर्धेत बालगोपाल तालीम मंडळ संघाने उत्तरेश्वर तालीम मंडळ संघावर ३-१ गोल फरकाने विजय मिळवला. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा सुरू आहे.
सुरुवातीपासून आक्रमक खेळणाऱ्या बालगोपाल तालीम संघाने सामान्यांवरील पकड शेवटपर्यंत कायम ठेवली. सुरुवातीचा काहीवेळ खेळ संथगतीने झाला असला तरीही नंतर वेगवान व आक्रमक चाली रचत प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणला. यात व्हिक्टरच्या पासवर ऋतुराज पाटील याने ३५ व्या मिनिटाला गोल नोंदवत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. यानंतर अधिकच्या वेळेत व्हिक्टरच्या पासवर साहिल डाकवे याने गोल नोंदवून पूर्वार्धात २-० अशी आघाडी घेतली.
उत्तरार्धात उत्तरेश्वर तालीम मंडळाच्या आघाडीच्या फळीने बालगोपाल तालीम मंडळ संघाची बचाव फळी भेदत आक्रमण केले. यात ५० व्या मिनिटाला प्रतीक कांबळे याने गोल नोंदवून गोल संख्या २-१ अशी केली. आक्रमण आणि प्रति आक्रमणाच्या या खेळामध्ये दोन्ही संघाना गोल नोंदवण्यात अपयश आले. अखेर सामन्याच्या ६६ व्या मिनिटाला व्हिक्टर याने गोल नोंदवत सामना ३-१ असा केला. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहिली. बालगोपाल तालीम मंडळाचा साहिल डाकवे उत्कृष्ट खेळाडू ठरला.

चौकट
आजचा सामना
खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध जुना बुधवार पेठ