विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती सुधारित होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती सुधारित होणार
विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती सुधारित होणार

विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती सुधारित होणार

sakal_logo
By

विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची
वेतननिश्चिती सुधारित होणार

उच्चशिक्षण सहसंचालकांचे कुलसचिवांना पत्र ; पदनाम बदलाचा आदेश रद्द

कोल्हापूर, ता. १० : शिवाजी विद्यापीठामधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदनाम आणि वेतनश्रेणी बदलाचा आदेश रद्द झाला आहे. त्यामुळे पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चिती सुधारित होणार आहे. फेब्रुवारी २०२३ चे वेतन सुधारित वेतननिश्चितीप्रमाणे करण्यात यावे, असे पत्र कोल्हापूर विभागीय उच्चशिक्षण सहसंचालकांनी विद्यापीठाला गुरूवारी पाठविले आहे.

या पदनाम व वेतनश्रेणी बदलाबाबतचा २४ फेब्रुवारी २०११ चा शासन निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात आला आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिप्रदान झालेल्या रक्कमेची वसुली सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर देय थकबाकीतून समायोजित करण्याबाबत १७ डिसेंबर २०१८ च्या शासन निर्णयात नमूद आहे. त्या विरोधात विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर ३१ जानेवारी २०२३ रोजी निकाल झाला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी शासन व उच्चशिक्षण संचालनालयाचे आदेश झाले आहेत.
...

प्रकियेसाठी १५ मार्चपर्यंत मुदत

शासन आदेशानुसार विद्यापीठातील ज्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पदनाम व वेतनश्रेणी बदल केला आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या ५ व्या व ६ व्या वेतन आयोगाची वेतननिश्चिती सुधारित करून फेब्रुवारी २०२३ च्या वेतन सुधारित वेतननिश्चितीप्रमाणे करायची आहे. ही प्रक्रिया तातडीने करण्यासाठी १५ मार्चपर्यंत सुधारित वेतन निश्चितीचे तक्ते मूळ सेवा पुस्तकासह तत्काळ सादर करावेत, असे या पत्राद्वारे विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक राजेसाहेब मारडकर यांनी विद्यापीठाला कळविले आहे.