अंगणवाडी भरतीसाठी गावागावात धावपळ

अंगणवाडी भरतीसाठी गावागावात धावपळ

जिल्हा परिषद ... लोगो
...

अंगणवाडी भरतीसाठी गावागावांत धावपळ

मेरिटवर होणार निवड; शैक्षणिक निकषातही केला बदल

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता.११:शासनाने अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस पदांच्या भरतीसाठी ३१ मे ही अंतिम तारीख दिली आहे. त्यामुळे गावागावातील अंगणवाड्यामधील रिक्त जागा भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. गुणवत्तेच्या आधारे ही भरती होणार असली तरीही, संबंधित उमेदवारांनी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्याकडे तगादा लावण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे.

राज्य शासनाने मेगा भरतीची घोषणा केली आहे. तरीही भरतीची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू आहे. नोकर भरतीसाठी कंपनीची नियुक्ती, नियमावली, जबाबदारी निश्चित करणे यातच ही भरती अडकून पडली आहे. दुसरीकडे मात्र अंगणवाडीच्या भरतीने जोर धरला आहे. राज्य शासनाने अंगणवाडी भरतीचा पॅटर्न तयार केला आहे. त्यानुसार ३१ मे २०२३ पूर्वी रिक्त जागांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. तसेच यापुढे रिक्त होणाऱ्या जागा या केवळ ३० दिवसांच्या आत भरण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

अंगणवाडी सेविका व मदतनीस पदाच्या शैक्षणिक व वयोमर्यादेत देखील शासनाने बदल केला आहे. पूर्वी ही वयोमर्यादा २१ ते ३० वर्षे अशी होती. यात आता बदल करून ती १८ ते ३५ अशी केली आहे. तसेच अंगणवाड्या आता स्मार्ट होत आहेत. नवनवीन तंत्रज्ञान व सॉफ्टवेअर याचा वापर वाढलेला आहे. त्यामुळे या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून अंगणवाड्या अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने मदतनीस, सेविका पदासाठी किमान १२ वी पास असा निकष ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर संबंधित व्यक्ती ही स्थानिक नागरिक असणे आवश्यक आहे. अनेक गावात याच मुद्द्यावरून वाद सुरू आहे.

....

गुणांवर आधारित थेट नियुक्ती

अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी कोणत्याही प्रकारची लेखी, तोंडी परीक्षा होणार नाही. गुणांवर आधारित थेट नियुक्ती होणार आहे. तर प्रतीक्षा यादीत असणाऱ्या उमेदवारांना पुढील वर्षभरात रिक्त झालेल्या जागेवरती नोकरीची संधी दिली जाणार आहे. तर अंगणवाडी सेविकाच्या रिक्त पदासाठी स्थानिक पात्र मदतनीसमधून थेट नियुक्ती देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी पात्र मदतनीस नसतील किंवा मदतनीस पद रिक्त असेल त्याठिकाणी जाहिरात देऊन भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com