
वसुंधरा किर्लोस्कर आंतरराष्ट्रीय महोत्सव समारोप
12323
कोल्हापूर : किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘अवनी’ च्या अनुराधा भोसले, संदीप चोडणकर व संजय पाटील यांच्या सत्काराप्रसंगी किर्लोस्कर समूहाचे आर. आर. देशपांडे, चंद्रहास रानडे, धीरज जाधव, डॉ. एस. पी. रथ, वीरेंद्र चित्राव, डॉ. दीपक भोसले व शरद आजगेकर.
...
वसुंधरा महोत्सवामुळे सामाजिक
जाणीवा समृद्ध होतीलः देशपांडे
शेतीतज्ज्ञ संजय पाटील, संदीप चोडणकर, ‘अवनी’ ला पुरस्कार प्रदान
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः'' किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामुळे सामाजिक जाणिवा समृद्ध होतील’, असा आशावाद किर्लोस्कर वसुंधराचे अध्यक्ष आर. आर. देशपांडे यांनी व्यक्त केला. सायबर महाविद्यालयात आयोजित किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘किर्लोस्कर वसुंधरा समूहाने मागील पंधरा वर्षांहून अधिक काळ ही चळवळ जोपासण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केलेला आहे. वर्तमानाचा व भविष्याचा विचार करता सकस अन्न, समृद्ध निसर्ग व आरोग्यपूर्ण समाज या त्रिसूत्रीवर गांभीर्याने विचार व सोबतच कृतिशील उपक्रमाची व्यापकता वाढविण्याची गरज आहे.’
कार्यक्रमाची सुरुवात प्रा. सचिन जगताप यांच्या बासरी वादनाने झाली. वीरेंद्र चित्राव यांनी या महोत्सवातील सहभागी नागरिक व तरुण वर्ग निश्चितपणे पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी पार पाडतील, असा आशावाद व्यक्त केला. किर्लोस्कर समूहाचे प्लांट हेड चंद्रहास रानडे यांनी या महोत्सवानिमित्त समाजातील विविध घटक एकत्र येऊन विचार मंथनास चालना मिळत असल्याचे सांगितले.
दरम्यान, शेतीतज्ज्ञ संजय पाटील यांना ‘वसुंधरा सन्मान’, संदीप चोडणकर यांना ‘वसुंधरा मित्र’ व अवनी या संस्थेस ‘वसुंधरा मित्र’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्मृतीचिन्ह, मानपत्र व रोप असे या पुरस्काराचे स्वरूप होते. किर्लोस्कर कंपनीचे मनुष्यबळ विकास अधिकारी धीरज जाधव व ‘सायबर’चे संचालक डॉ. एस.पी. रथ यांनीही मनोगत व्यक्त केले. शेतीतज्ज्ञ संजय पाटील यांचे भरड धान्याचे महत्त्व व गरज या विषयावर चित्रफितीद्वारे व रोपांच्या व बियांच्या प्रात्यक्षिकांसह प्रबोधनपर व्याख्यान झाले.
सूत्रसंचालन सामाजिक बांधिलकी अधिकारी शरद अजगेकर यांनी केले. डॉ. सुरेश आपटे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. दीपक भोसले, सुवर्णा भांबुरकर, डॉ.सोनिया राजपूत, डॉ. कालिंदी रानभरे, डॉ.दुर्गेश वळवी, प्रा.महेंद्र जनवाडे, प्रा.शर्वरी काटकर आदी उपस्थित होते.