खंडोबा तालीम उपांत्य फेरीत दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खंडोबा तालीम उपांत्य फेरीत दाखल
खंडोबा तालीम उपांत्य फेरीत दाखल

खंडोबा तालीम उपांत्य फेरीत दाखल

sakal_logo
By

88444
कोल्हापूर : महापालिका आयोजित फुटबॉल स्पर्धेत शनिवारी जुना बुधवार पेठ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात झालेल्या सामन्यातील चुरशीचा क्षण. (बी. डी. चेचर : सकाळ छायाचित्रसेवा)

खंडोबा तालीम उपांत्य फेरीत दाखल 
महापालिका फुटबॉल चषक; जुना बुधवार संघावर २ - १ ने मात
कोल्हापूर, ता. ११ : महापालिका फुटबॉल चषक स्पर्धेमध्ये संयुक्त जुना बुधवार पेठ संघावर मात करत खंडोबा तालीम मंडळ संघाने उपांत्य फेरीत प्रेवश केला. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा सुरू आहे.
खंडोबा तालीम विरुद्ध जुना बुधवार यांच्यातील सामना रंगतदार ठरला. दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत सामन्यात पकड ठेवली. आक्रमक आघाडीची फळी तितकीच सावध व बचाव फळी याला मिळालेली गोल रक्षणाची साथ यामुळे सामन्यात रंगत आली. पूर्वार्धात आक्रमण प्रतिआक्रमण सुरू होते. सामन्याच्या ३६ व्या मिनिटाला खंडोबा संघाच्या अजीज मोमीन याने गोल नोंदवत सामन्यात पहिला गोल नोंदवला.
उत्तरार्धात जुना बुधवारच्या प्रकाश संकपाळ याने गोल नोंदवत सामना पुन्हा एक गोल बरोबरीत आणला. या नंतर दोन्ही संघांच्या आघाडी फळीच्या खेळाडूंनी गोल नोंदवण्याचे केलेले प्रयत्न वाया गेले. खंडोबा तालीमचा गोलरक्षक निखिल खन्ना याने चिवट गोलरक्षण केले. सामन्याच्या ७२ व्या मिनिटाला खंडोबा संघाचा श्रीधर परब याने गोल नोंदवून सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहत खंडोबा तालीम मंडळ संघने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दिग्विजय असणेकर उत्कृष्ट खेळाडू ठरला.
----------
उद्याचा सामना
रविवारी रंगपंचमीनिमित्त सामना खेळवला जाणार नसून सोमवारी (ता. १३) श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्लब यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे.