संप निर्धार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संप निर्धार
संप निर्धार

संप निर्धार

sakal_logo
By

जुनी पेन्शन लागू
करायला भाग पाडू

जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीत निर्धार

कोल्हापूर, ता. ११ : जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र शासनाला लागू करायला लावणारच, असा निर्धार कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीत आज करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर सेवक समन्वय समितीने १४ मार्चपासून पुकारलेल्या बेमुदत संपात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा शंभर टक्के सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. एस. डी. लाड अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवनात बैठक झाली.
लाड म्हणाले, ''सर्व कर्मचारी, मुख्याध्यापक, प्राचार्य व संस्थाचालकांनी संपात सहभागी होऊन संप शंभर टक्के यशस्वी करायचा आहे. १४ मार्चला सकाळी ११ वाजता कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यातील सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिकेतर सेवकांनी टाऊन हॉल उद्यानात जमायचे आहे. इतर तालुक्यांतील कर्मचाऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी प्रांत कार्यालयासमोर उपस्थित राहावे.'' मुख्याध्यापक संघाचे शिक्षक नेते दादा लाड, सचिव दत्ता पाटील, राजाराम वरुटे, बाबा पाटील, खंडेराव जगदाळे, सुधाकर निर्मळे, बी. डी. पाटील, प्रा. सी. एम. गायकवाड, अरुण मुजुमदार, मनोहर जाधव, प्रा. आण्णासाहेब बागडी, सुधाकर सावंत, इरफान अन्सारी, राजेश वरक, करण सरनोबत, काकासाहेब भोकरे, उमेश देसाई, संदीप पाटील, बालाजी पांढरे, शिवाजी माळकर, विलास साठे, सतीश लोहार उपस्थित होत.
..........

परीक्षेची कामे करणार
संपात सहभाग घेतला तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेची सर्व कामे केली जातील; पण कर्मचारी मस्टरमध्ये सह्या करणार नाहीत, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.