
आर्थिक कारणातून तरुणाला मारहाण
आर्थिक कारणातून तरुणाला मारहाण
कोल्हापूर : आर्थिक कारणातून तरुणाला मारहाण करण्याची घटना गुरुवारी (त ९) सायंकाळी घडली. याप्रकरणी शुभम शिंदे, अभिषेक शिंदे, गीता शिंदे (सर्व र. केर्ली, करवीर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद पुष्कराज भिमराव शिंदे (वय ३१, र. नेर्ली, ता. करवीर) यांनी दिली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्कराज, त्याचे वडील भीमराव आणि भाऊ अमृतराज हे तिघेजण त्यांच्या प्लॉटवर स्वच्छता करण्यासाठी गेले होते. केर्ली येथील पाण्याच्या टाकीजवळ त्यांचा प्लॉट आहे. यावेळी तेथे शुभम आणि अभिषेक आले. भीमराव आणि त्यांच्यात आर्थिक कारणातून वाद होता. यावेळी त्यांनी भीमराव यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी पुष्कराज त्यांना अडवण्यासाठी पुढे गेला. शुभम आणि अभिषेक यांच्या हातात असणाऱ्या धारदार शस्त्राने त्यांनी वार केला. यामुळे पुष्कराच्या हाताला जखम झाली. त्यांनी पुष्कराला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.