Sun, April 2, 2023

महिला व कुमार गट कुस्ती निवड चाचणी १६ मार्चला
महिला व कुमार गट कुस्ती निवड चाचणी १६ मार्चला
Published on : 13 March 2023, 1:12 am
महिला व कुमार गट कुस्ती
निवड चाचणी १६ मार्चला
कोल्हापूर, ता. १३ : वरिष्ठ महिला गट व कुमार (मुले) कुस्तीगीर जिल्हा व शहर निवड चाचणी कुस्ती स्पर्धा १६ मार्चला होत आहे. कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघ व इचलकरंजी शहर तालीम संघातर्फे त्याचे आयोजन केले आहे. नंदगाव (ता. करवीर) येथे निवड चाचणी होईल. ४३ वी कुमार अजिंक्यपद स्पर्धा इचलकरंजीतील नामदेव मैदानावर २५ व २६ मार्चला होणार आहे. २४ वी वरिष्ठ महिला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा व पहिली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २३ व २४ मार्चला होत आहे. सांगलीतील क्रीडा संकुलात त्याचे आयोजन केले आहे. या दोन्ही संघांकरिता निवड चाचणी होत असून, खेळाडूंनी सकाळी आठ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.