दिलबहार उपांत्य फेरीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिलबहार उपांत्य फेरीत
दिलबहार उपांत्य फेरीत

दिलबहार उपांत्य फेरीत

sakal_logo
By

८९११९
-
लोगो- महापालिका चषक फुटबॉल स्पर्धा

दिलबहार तालीम उपांत्य फेरीत 
झुंजार क्लब संघावर ३ -० गोल फरकाने विजय

कोल्हापूर , ता. १४ : महापालिका चषक फुटबॉल स्पर्धेमध्ये दिलबहार तालीम संघाने झुंजार क्लब संघावर ३ - ० गोल फरकाने विजय मिळवत उपांत्य सामन्यात प्रवेश केला. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा सुरू आहे. दिलबहार तालीम संघाने आक्रमक खेळाच्या जोरावर एकतर्फी विजयाची नोंद केली. सामन्याच्या सुरुवातीला झुंजार क्लबकडून चढाईचे प्रयत्न झाले. मात्र, यात यश आले नाही. दिलबहारच्या आक्रमणाने झुंजारची मध्य फळी व बचाव फळी कोलमडली. यातच स्वयंम साळोखे याने ११ व्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला १ -० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर झुंजार क्लबकडून अधिक बचावात्मक खेळ झाल्याने दिलबहा कडून गोल झाले नाहीत.  
उत्तरार्धात झुंजार क्लबकडून संमिश्र खेळ झाला. यात काही प्रसंगी आक्रमक तर काही प्रसंगी बचावात्मक खेळ करत संघर्ष केला. मात्र यश आले नाही. दिलबहारकडून सामन्याच्या ५५ व्या मिनिटाला स्वयंम साळोखेच्या पास सतेज साळोखे याने गोल नोंदवत सामन्यात २-० अशी आघाडी घेतली, तर थोड्याच वेळात ७३ व्या मिनिटाला सचिन पाटीलच्या पास वर सतेजनेच वैयक्तिक दुसऱ्या तर संघासाठी तिसऱ्या गोलची नोंद केली. सतेज साळोखे उत्कृष्ट खेळाडू ठरला. 

चौकट
आजचा सामना 
बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध झुंजार क्लब