विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा कर्जमुक्ती मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा कर्जमुक्ती मेळावा
विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा कर्जमुक्ती मेळावा

विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा कर्जमुक्ती मेळावा

sakal_logo
By

विदर्भ कोकण ग्रामीण
बँकेतर्फे कर्जमुक्ती मेळावा

कोल्हापूर, ता. १४ : कोल्हापूरसह १३ ठिकाणी थकीत खातेदारांसाठी विशेष कर्जमुक्ती मेळाव्याचे आयोजन विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या वतीने केले होते. यामध्ये जिल्ह्यतील लक्ष्मीपुरी, हातकणंगले, शिरोळ, आजरा व गारगोटी ही शाखा सहभागी झाल्या होत्या. त्यासाठी रत्नागिरी क्षेत्रीय कार्यालयातील क्षेत्रिय प्रबंधक बाबुराव सामंत, लक्ष्मीपुरी शाखेचे प्रबंधक नितीन जाधव व संबंधित शाखेचे सर्व शाखा व्यवस्थापक उपस्थित होते.
काही विशेष सुट, सुविधा देत कर्जमुक्ती मेळाव्याचे आयोजन केले. बँकेचे अध्यक्ष विजय वर्मा यांनी निर्णय घेत आपल्या कर्ज खाते धारकांसाठी एकाच दिवशी तेरा जागेवर ऋण मुक्ती मेळाव्याचे आयोजन केले गेले. या ऋण मुक्ती मेळाव्यास प्रतिसाद मिळाला असून, ३०० ऋण खात्यात तडजोड झाली आहे. बँकेद्वारे भविष्यात आयोजित होणाऱ्या ऋण मुक्ती मेळाव्यास प्रतिसाद द्यावा व आपले खाते तडजोडीच्या माध्यमातून बंद करावे असे आवाहन केले आहे .