
शहरातील तालमींना निधी द्या
12365
कोल्हापूर : शहरातील तालीम व तालीम संस्थांना निधी द्यावा, या मागणीचे निवेदन पालकमंत्री दीपक केसरकर यांना देताना आमदार जायश्री जाधव.
शहरातील तालमींना निधी देण्याची
आमदार जाधवांची पालकमंत्र्यांकडे मागणी
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील तालमी व तालीम संस्थांमध्ये मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी व दुरुस्तीच्या कामासाठी विशेष बाब म्हणून भरघोस निधी द्यावा, अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. जिल्हा नियोजनच्या बैठकीत निधीची तरतूद करण्याचे आश्वासन पालकमंत्री केसरकर यांनी दिले होते. त्यामुळे जाधव यांनी मुंबई येथे पालकमंत्री केसरकर यांची भेट घेतली.
निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूरच्या तालमी व तालीम संस्थांना मोठा इतिहास आहे. नव्या दमाचे मल्ल घडविण्यात तालमी आघाडीवर आहेत. तालीम संस्थांमधून उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू तयार होत आहेत; परंतु काही तालमी व तालीम संस्था मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे खेळाडूंची गैरसोय होत आहे. निधीची तरतूद करण्याचे आश्वासन पालकमंत्री केसरकर यांनी दिले.