
होळकर जयंती
12373
कोल्हापूर : सरसेनापती मल्हारराव होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात सहभागी बबन रानगे, प्रा. जी. बी. कोळेकर, सुनील एडके, प्रा. शरद गलांडे, पांडुरंग बोडके आदी.
मल्हारराव होळकर मराठ्यांच्या
इतिहासातील कोहिनूर हिराः रानगे
कोल्हापूर, ता. १६ : सरसेनापती मल्हारराव होळकर मराठ्यांच्या इतिहासातील कोहिनूर हिरा आहेत, असे मल्हार सेनेचे बबनराव रानगे यांनी आज येथे सांगितले.
महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित मल्हारसेना व युवक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मल्हारराव होळकर यांच्या ३३० जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात कार्यक्रम झाला.
रानगे म्हणाले, ‘शौय, धाडस, स्वराज्याबद्दल श्रद्धा, विश्वास व आदर यामुळे पहिले सुभेदार मल्हारराव होळकर यांना खासगी जहागिरी मिळाली. मल्हाररावांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस नव्हे तर प्रत्येक क्षण म्हणजे इतिहासाचे सोनेरी पान आहे.’
शिवाजी विद्यापिठाच्या सुटा संघटनेचे अध्यक्ष प्रा. जी. बी. कोळेकर, प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष सुनिल एडके, कृषी महाविद्यालयाचे किटकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. शरद गलांडे, केमिस्ट क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष पांडुरंग बोडके, जिल्हा उपनिबंधक कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्ष स्वाती बोराटे, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे संचालक उत्तम वावरे व जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेच्या संचालिका सारिका पुजारी यांचा सत्कार झाला. सिध्दार्थ बन्ने, छगन नांगरे व प्रा. गलांडे यांनी मनोगत व्यक्त केले. यशवंत शेळके, धनगर महासंघाचे जिल्हाध्यक्ष राघू हजारे, पांडूरंग वगरे, बाळासाहेब दाईंगडे, रामचंद्र रेवडे, मायापा धनगर आनंदा धनगर, विक्रम वगरे, तुकाराम आष्टेकर, अनंद दपडे उपस्थित होते. बाबूराव बोडके यांनी प्रास्ताविक केले. शहाजी सिद यांनी आभार मानले.