
बालगोपाल अंतिम फेरीत
महापालिका चषक फुटबॉल स्पर्धा
89793
कोल्हापूर : महापालिका चषक फुटबॉल स्पर्धेत बालगोपाल विरुद्ध दिलबहार यांच्या सामन्यातील क्षण.
(मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
बालगोपाल अंतिम फेरीत
---
‘दिलबहार’वर मात; खंडोबा तालीम विरुद्ध रंगणार महामुकाबला
कोल्हापूर, ता. १७ : दुसऱ्या उपांत्य सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाने दिलबहार तालीम मंडळावर टाय ब्रेकरमध्ये दोन विरुद्ध एक गोलफरकाने विजय मिळवत महापालिका फुटबॉल चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. रविवारी (ता. १९) खंडोबा तालीम मंडळाविरुद्ध जेतेपदासाठी अंतिम सामना होणार आहे. छ्त्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा सुरू आहे.
अटीतटीच्या झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ केला. दिलबहार तालीम संघाने आक्रमक सुरुवात केली. मात्र, बालगोपाल संघात फळी व बचाव फळीने संयमी खेळ करीत गोल जाळीवरील आक्रमणे थोपवून धरली. यातच बालगोपाल संघाकडून ‘दिलबहार’च्या गोल जाळीवर आक्रमण झाले. मात्र, वेगवान फटका गोल जाळीवरून गेला. आकारमान प्रतिआक्रमण व बचाव यात रंगलेला सामना पूर्णवेळ गोलशून्य बरोबरीत राहिला. बालगोपाल संघासाठी उत्कृष्ट बचाव करणारा गोलरक्षक परमजित बाघेल उत्कृष्ट खेळाडू ठरला.
-------------
असा झाला टाय ब्रेकर
दिलबहार*बालगोपाल
संडे ओबेम- तटवला*प्रतीक पोवार- गोल
सचिन पाटील- गोल*शुभम जाधव- तटवला
प्रमोदकुमार पांडे- बाहेर मारला*रोहित कुरणे- तटवला
इचिबेरी- तटवला*आशिष कुरणे- गोल
सनी सणगर- गोल खांबाला तटला*-
--------------
चौकट
आज चार संघांमध्ये सामने
स्पर्धेदरम्यान उद्या (ता. १८) दुपारी चारला प्रसारमाध्यमे, माजी नगरसेवक, पोलिस, महसूल अधिकारी आणि मनपा अधिकारी व कर्मचारी अशा चार संघांमध्ये प्रदर्शनीय सामने होणार आहेत.