Wed, May 31, 2023

ब गट फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
ब गट फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
Published on : 17 March 2023, 4:54 am
लोगो-
श्री शाहू छत्रपती फुटबॉल लीग
‘ब’ गट फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
कोल्हापूर, ता. १७ : श्री शाहू छत्रपती के.एस.ए. फुटबॉल लीग ‘ब’ गट फुटबॉल स्पर्धेला पोलो मैदानावर सुरुवात झाली. स्पर्धेत १६ संघ सहभागी झाले असून, चार गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पीटीएम ‘ब’ विरुद्ध रामानंदनगर फुटबॉल क्लब यांच्यात झालेल्या सामन्यात ‘पीटीएम’ने ६- १ गोलफरकाने विजय मिळविला. बावडा फुटबॉल क्लब ‘अ’ विरुद्ध प्रॅक्टिस क्लब ‘ब’मध्ये झालेल्या सामन्यात बावडा संघाने २- १ गोलफरकाने विजय मिळविला.