शाहू स्मृती शताब्दी माहितीपट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहू स्मृती शताब्दी माहितीपट
शाहू स्मृती शताब्दी माहितीपट

शाहू स्मृती शताब्दी माहितीपट

sakal_logo
By

राजर्षी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय
माहितीपट महोत्सवात सहभागाचे आवाहन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन अधिविभागातर्फे ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय माहितीपट महोत्सव’ २७ व २८ एप्रिलला होत आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष महोत्सवानिमित्त त्याचे आयोजन केले आहे. मानव्यशास्त्र सभागृहात हा महोत्सव होईल. महोत्सवात महाविद्यालयीन, विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थी सहभाग घेऊ शकतील.
इच्छुकांनी नोंदणी अर्ज, महाविद्यालयाचे ना-हरकत प्रमाणपत्र मेल ड्राईव्हच्या माध्यमातून माहितीपटाची क्लिप journalism@unishivaji.ac.in मेलवर १७ एप्रिल सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाठवावी. महोत्सवात प्रवेशासाठी नोंदणी करणे आवश्यक असून प्रवेश नि:शुल्क आहे. महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना, सुचविलेले विषय, नियम, अटी तसेच नोंदणी अर्ज नमुना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर http://www.unishivaji.ac.in उपलब्ध आहे. महोत्सवात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवास व इतर खर्च स्वतः करायचा आहे. अधिक माहितीसाठी सह-समन्वयक डॉ. सुमेधा साळुंखे व परशराम पवार यांच्याशी विभागाच्या journalism@unishivaji.ac.in मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन अधिविभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. निशा पवार यांनी केले आहे.