महाराष्ट्र राज्य सिनीयर निमंत्रीत क्रिकेट स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र राज्य सिनीयर निमंत्रीत क्रिकेट स्पर्धा
महाराष्ट्र राज्य सिनीयर निमंत्रीत क्रिकेट स्पर्धा

महाराष्ट्र राज्य सिनीयर निमंत्रीत क्रिकेट स्पर्धा

sakal_logo
By

12402
क्षितिज पाटील

12403
अनिकेत नलवडे

12405
विशांत मोरे

लोगो-
महाराष्ट्र राज्य सीनिअर निमंत्रित क्रिकेट स्पर्धा

कोल्हापूर जिल्हा संघ विजयी
---
विशांत मोरे, अनिकेत नलवडे यांची शतके; क्षितिज पाटीलचे सात बळी
कोल्हापूर, ता. १८ : महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन आयोजित निमंत्रित सीनिअर (दोनदिवसीय) क्रिकेट स्पर्धेतील सामना पुणे येथे कोल्हापूर जिल्हा संघ विरुद्ध धुळे जिल्हा संघ यांच्यात झाला. या सामन्यात कोल्हापूर जिल्हा संघाने पहिल्या डावाच्या अधिक्यावर विजय मिळविला.
कोल्हापूर जिल्हा संघाने पहिल्या डावात ७४.५ षटकांत सात बाद ३९७ धावांवर घोषित केला. यात विशांत मोरे १३६, अनिकेत नलवडे १२३, चेतन नार्वेकर ५४ धावा केल्या. धुळे जिल्हा संघाकडून पहिल्या डावात प्रथमेश कुंवर ३, अनिकेत मोरे २, कुणाल गिरसे १ बळी घेतला. धुळे जिल्हा संघाने पहिला डाव ८९.१ षटकांत सर्वबाद २३४ धावात संपुष्टात आला. यात आनंद ८८, लवकेश देशमुख ५४ व मनीष बोरसे यांनी ३२ धावा केल्या. कोल्हापूर जिल्हा संघाकडून पहिल्या डावात क्षितिज पाटीलने ७, संदीप पाटील २ व श्रेयस चव्हाणने १ बळी घेतला. अशा प्रकारे कोल्हापूर जिल्हा संघाने पहिल्या डावाच्या अधिक्यावर विजय मिळविला.