माजी नगरसेवक संघाचा विजय

माजी नगरसेवक संघाचा विजय

लोगो-
महापालिका चषक फुटबॉल स्पर्धा

89962
कोल्हापूर : महापालिका फुटबॉल चषक स्पर्धेतील प्रदर्शनीय सामन्यात विजयी माजी नगरसेवक संघाला बक्षीस देताना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे.


माजी नगरसेवक संघाचा विजय
---
प्रदर्शनीय सामना; आज ‘खंडोबा’ विरुद्ध ‘बालगोपाल’ महामुकाबला
कोल्हापूर, ता. १८ : महापालिका चषक फुटबॉल स्पर्धेत पोलिस, महसूल, पत्रकार, महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसह माजी नगरसेवकांच्या संघाने मैदानावर जोरदार खेळ केला. यात माजी नगरसेवकांचा संघ सरस ठरला. प्रदर्शनीय सामन्यातील अंतिम सामना माजी नगरसेवक विरुद्ध महापालिका अधिकारी-कर्मचारी संघांत झाला. एक गोल बरोबरीत झालेल्या या सामन्यात ट्रायब्रेकरमध्ये माजी नगरसेवक संघाने ४-३ गोलफरकाने विजय मिळविला. संघाचा मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन गौरव करण्यात आला.
तत्पूर्वी, पहिला सामना कोल्हापूर पत्रकार संघ विरुद्ध माजी नगरसेवक संघांदरम्यान झाला. सामन्यात नगरसेवक संघाकडून विनायक फाळके यांनी दोन गोल नोंदवत संघाला विजय मिळवून दिला. दुसरा प्रदर्शनीय सामना महापालिका अधिकारी-कर्मचारी संघ विरुद्ध पोलिस व महसूल कर्मचारी संघात झाला. अत्यंत चुरशीने झालेल्या सामन्यात महापालिका अधिकारी-कर्मचारी संघाकडून उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी एक, अक्षय सरनाईक यांनी एक गोल नोंदवत २-० अशा गोलफरकाने हा सामना जिंकला. या स्पर्धेचा अंतिम सामना खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ संघांत दुपारी चारला होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com