शिवाजी विद्यापीठाच्या संघांसह मुंबई, नांदेड विद्यापीठ विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी विद्यापीठाच्या संघांसह
मुंबई, नांदेड विद्यापीठ विजय
शिवाजी विद्यापीठाच्या संघांसह मुंबई, नांदेड विद्यापीठ विजय

शिवाजी विद्यापीठाच्या संघांसह मुंबई, नांदेड विद्यापीठ विजय

sakal_logo
By

लोगो आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा
शिवाजी विद्यापीठाच्या संघांसह
मुंबई, नांदेड विद्यापीठ विजय
कोल्हापूर, ता.‌ १८ : शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत प्राथमिक फेरीच्या सहाव्या दिवशी आज शिवाजी विद्यापीठाच्या दोन्ही संघांसह मुंबई व नांदेड विद्यापीठांनी विजय मिळवला.
पहिला सामन्यात मुंबई विद्यापीठाने नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठावर ५५ धावांनी विजय मिळवला. मुंबईचे संजय पवार ‘सामनावीर’ ठरले.
शिवाजी विद्यापीठ-ब संघाने लोणेरेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठावर ४ गडी राखून विजय मिळवला. अनिल साळुंखे ‘सामनावीर’ ठरले.
शिवाजी विद्यापीठाने‌ नागपूरच्या महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठावर ७ गडी राखून मात केली. शिवाजी विद्यापीठाचे विनायक शिंदे सामनावीर ठरले.
नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाने नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठावर चार गडी राखून पराभव केला. प्रकाश मोपडे ‘सामनावीर’ ठरले.