''खंडोबा'' जेता ''बालगोपाल'' उपविजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''खंडोबा'' जेता ''बालगोपाल'' उपविजेता
''खंडोबा'' जेता ''बालगोपाल'' उपविजेता

''खंडोबा'' जेता ''बालगोपाल'' उपविजेता

sakal_logo
By

गर्दी : 90161 (सहा कॉलम)
---
बातमी वापरावेत- 90174, 90175

मनपा चषका ''खंडोबा''कडे
टायब्रेकरमध्ये ४-३ गोलने विजय; बालगोपाल तालीम मंडळास उपविजेतेपद 

कोल्हापूर, ता. १९ : खंडोबा तालीम मंडळ संघाने बालगोपाल तालीम मंडळवर टायब्रेकरमध्ये ४ विरुद्ध ३ गोल फरकाने विजय मिळवत महापालिका फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले. राजर्षी शाहू स्टेडियमवर झालेल्या या सामन्यातील विजेत्यांना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते  गौरवण्यात आले. यावेळी उपायुक्त रविकांत अडसूळ,अरुण नरके ,अमित कामत उपस्‍थित होते.
तत्पूर्वी अंतिम सामन्याचे उदघाटन आमदार ऋतुराज पाटील, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते झाले. अंतिम सामना रटाळवाणा ठरला. दोन्ही संघानी आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोल करणे शक्य झाले नाही. सामन्याच्या संपूर्ण वेळेत फक्त खंडोबा संघाच्या खेळाडूने गोलजाळीवर हल्ला चढवत अयशस्वी प्रयत्न केला. सामन्याच्या सुरुवातीला चेंडूवर पकड मिळवण्यासाठी दोन्ही संघांकडून प्रयत्न झाले. मात्र, चेंडू मैदानभर फिरता राहिला. पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर उत्तरार्धात दोन्ही संघ आक्रमक खेळातील अशी अपेक्षा असताना प्रेक्षकांच्या पदरी निराशा पडली. दोन्ही संघातील खेळाडूंना प्रतिस्पर्धी संघाच्या गोलजाळीनजीक जाऊन गोल नोंदवणे शक्य झाले नाही. अशातच पूर्ण वेळ संपता सामना गोलशून्य बरोबरीत राहून टायब्रेकरवर खेळवण्यात आला.

चौकट
असा झाला टायब्रेकर   
बालगोपाल                                    खंडोबा 
प्रतीक पोवार   - गोल                     मायकल सेफ - गोल 
दिग्विजय वाडेकर - बाहेर मारला      प्रथमेश गावडे  - गोल 
प्रसाद सरनाईक  - गोल                  प्रभू पोवार - गोल 
ऋतुराज पाटील  - गोल                   ऋतुराज संकपाळ - गोल 
व्हिक्टर  - गोल खांबावर मारला       

चौकट
स्पर्धेतील उत्कृष्ट 
गोलकिपर   - परमजितसिंग बघेल   - बालगोपाल (90165)
डिफेन्स   -   प्रसाद सरनाईक  - बालगोपाल(90166)
हाफ   - प्रभू पोवार  - खंडोबा (90167) 
फॉरवर्ड  - दिग्विजय असणेकर  -खंडोबा (90168)  
मालिकावीर  - मायकल सेफ - खंडोबा (90169)

चौकट 
विजयी ट्रॉफीसह सवाद्य मिरवणूक
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ''खंडोबा'' संघाने स्पर्धेचे जेतेपद पटकावल्याचा आनंद साजरा करण्यात आला. विजयी ट्रॉफीसह सवाद्य मिरवणुकीने परिसरात पांढऱ्या निळ्या पताका फडकवण्यात आल्या. मिरवणुकीत खेळाडूंसह परिसरातील नागरिक व महिलाही सहभागी झाले होते.