महावितरणच्या पुणे विभागातील 
थकबाकी १४ हजार कोटींवर

महावितरणच्या पुणे विभागातील थकबाकी १४ हजार कोटींवर

‘महावितरण’च्या पुणे विभागातील
थकबाकी १४ हजार कोटींवर
कोल्हापूर, ता. २० : ‘महावितरण’च्या पुणे प्रादेशिक विभागातील २५ लाखांहून अधिक वीज ग्राहकांची थकबाकी १४ हजार ३५४ कोटी रुपयांवर पोचली आहे. त्यात १२ लाख ५३ हजार ९७० कृषिपंप ग्राहकांचा समावेश आहे. त्यांच्याकडे १२ हजार ४९९ कोटी, तर अकृषक १२ लाख ६३ हजार ५२९ ग्राहकांकडे एक हजार ८६४ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
‘महावितरण’ने विभागातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. ग्राहकांना वीज बिल भरणे सोयीचे व्हावे म्हणून मार्चअखेर शनिवार, रविवार व सुटीच्या दिवशी वीज बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येत आहे.
अकृषक ग्राहकांपैकी सर्वाधिक थकबाकी सार्वजनिक पथदिवे योजनेकडे आहे. त्याचा आकडा ११९६ कोटी रुपये आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेकडे ४१७ कोटी रुपयांची थकबाकी असून, १० लाख ६७ हजार ५६० घरगुती ग्राहकांकडे १४३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. एक लाख १७ हजार ३३४ वाणिज्यिक ग्राहकांकडे ४४ कोटी, तर २२ हजार ५४२ औद्योगिक ग्राहकांकडे ३७ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com