
पोलिस वृत्त
दुचाकीच्या धडकेत युवक गंभीर
कोल्हापूर : बालिंगा (ता. करवीर) येथील पेट्रोल पंपाच्या परिसरात दुचाकीने दिलेल्या धडकेत युवक गंभीर जखमी झाला. देवेंद्रकुमार नंदकिशोर खुळे (वय ३६, रा. अंबाई टॅँक, रंकाळा, मूळ रा. जालना) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
......
बसस्थानक परिसरातून दुचाकी चोरीस
कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून चोरट्याने दुचाकी लंपास केली. ही दुचाकी पार्सल गोडाऊन येथे पार्किंग केली होती. सचिन दशरथ परीट (वय ३६, रा. भोज, निपाणी, जि. बेळगांव) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली.
........
कुत्रे आडवे आल्याने अपघात
कोल्हापूर : टाकवडे रोडवर कुत्रे आडवे आल्याने झालेल्या अपघातात आई व मुलगा जखमी झाले. गुढी पाडव्यानिमित्त धुळोबा देवाचे दर्शन घेऊन ते दुचाकीवरून घरी परतत होते. कुणाल अनिल कागले (वय २४) व त्याची आई सुनीता अनिल कागले (४६, दोघे रा. शिरढोण, ता. शिरोळ) अशी त्यांची नावे आहेत. सुनीता यांच्या डोक्यास दुखापत झाली असून, कुणालच्या उजव्या हाताला जखम झाली. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले.
.......
तणनाशक प्राशन केलेल्या एकाचा मृत्यू
कोल्हापूर : डोणोली (ता. शाहूवाडी) येथील तणनाशक प्राशन केलेल्या एकाचा उपचारादरम्यान मंगळवारी (ता. २१) मृत्यू झाला. यशवंत सखाराम शेळके (वय ५२, रा. डोणोली, ता. शाहूवाडी) असे त्यांचे नाव आहे. शेळके यांनी गुरुवारी (ता. १६) सायंकाळी तणनाशक प्राशन केले होते. बांबवडेतील ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार झाले. त्यानंतर त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले होते. सीपीआर पोलिस चौकीत घटनेची नोंद झाली.