वर्षाविश्‍वास मंडळ,
सोल्जर्स ग्रुप विजयी

वर्षाविश्‍वास मंडळ, सोल्जर्स ग्रुप विजयी

लोगो- श्री शाहू छत्रपती केएसए ब गट फुटबॉल स्पर्धा
वर्षाविश्‍वास मंडळ,
सोल्जर्स ग्रुप विजयी
कोल्हापूर, ता. २५ : श्रीमंत शाहू छत्रपती के.एस.ए.ब गट फुटबॉल साखळी स्पर्धेतील झालेल्या सामन्यात सोल्जर्स ग्रुप संघाने इंगवले कॉलनी संघावर १ - ० गोल फरकाने. तर वर्षाविश्‍वास तरुण मंडळ संघाने सुभाषनगर फुटबॉल क्लब संघावर २ - १ गोल फरकाने विजय मिळवला. पोलो मैदानावर ही स्पर्धा सुरु आहे. 
सोल्जर्स विरुद्ध इंगवले कॉलनी दरम्यान झालेला सामना अटीतटीचा झाला. सामन्याच्या सुरुवातीलाच तिसऱ्या मिनिटाला सोल्जर्सच्या रोहित सूर्यवंशी याने गोल नोंदवून सामन्यात आघाडी घेतली. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहत सामना जिंकला. चुकीचा खेळ करणाऱ्या सोल्जर्सचा खेळाडू स्वप्नील काटकर याला दोन यल्लो असे रेड कार्ड बहाल करण्यात येऊन सामना बंदीची कारवाई करण्यात आली.
वर्षाविश्‍वास विरुद्ध सुभाषनगर यांच्यातील सामना चुरशीचा झाला. सामन्यात वर्षाविश्‍वास कडून शिवम लोकरे १३ व विनायक चौगले १८ व्या मिनिटाला गोल नोंदवले. तर सुभाषनगरच्या ओमकार चौगले याने १५ व्या मिनिटाला गोल नोंदवला. अखेर वर्षाविश्‍वास संघाने सामना २ - १ गोल फरकाने जिंकला. सुभाषनगरचा खेळाडू रोहन चव्हाण याने चुकीचा खेळ केल्याने त्याला दोन यल्लो असे रेड कार्ड होऊन सामना बंदीची कारवाई करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com