बाजार समिती निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजार समिती निवडणूक
बाजार समिती निवडणूक

बाजार समिती निवडणूक

sakal_logo
By

बाजार समिती निवडणुकीसाठी २८ अर्ज दाखल
कोल्हापूर, ता. २८ : शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज दिवसभरात एकूण २८ अर्ज दाखल झाले. यात कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदार संघातील २३ तर ग्रामपंचायत मतदार संघातील पाच अर्जांचा समावेश आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांसह मतदारांनी कंबर कसली आहे. काल (ता. २७) एकूण आठ जणांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले. आज दिवसभरात हा आकडा तिप्पट झाला. कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदार संघातून सर्वसाधारण प्रतिनिधी गटात १६, महिला प्रतिनिधी दोन, इतर मागासवर्गीय चार तर विमुक्त जाती-भटक्या जमाती गटातून एक अर्ज दाखल झाला. ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण गटात चार तर अडते व व्यापारी गटात एक अर्ज दाखल झाला आहे.
कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदार संघातील सर्वसाधारण प्रतिनिधी गटातून संतोष धुमाळ, ग्रामपंचायत मतदार संघातील सर्व साधारण प्रतिनिधी गटातून सर्जेराव पाटील तर अडते व व्यापारी गटातून जमीर बागवान यांचे अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, दोन दिवसांत दाखल झालेल्या अर्जांचा आकडा ३६ पर्यंत पोचला आहे.