बाजार समिती निवडणूक

बाजार समिती निवडणूक

४४ अर्ज दाखल, मोर्चेबांधणी सुरू
कोल्हापूर, ता. २९ : शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आजपर्यंत एकूण ८० अर्ज दाखल झाले आहेत. आज दिवसभरात एकूण ४४ अर्ज दाखल झाले. निवडणुकीची रंगत वाढत असून, इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. तीन एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. २८ एप्रिलला मतदान होणार आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीची चर्चा जिल्ह्यात सुरु झाली आहे. अर्ज भरलेले उमेदवार मतदारांपर्यंत पोचत असून, निवडणुकीची रणनीती ठरवू लागले आहेत. एकूण १९ हजार ८६४ मतदार आहेत. कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदार संघातून सर्वसाधारण प्रतिनिधी गटातून आज तब्बल १९ अर्ज दाखल झाले. महिला प्रतिनिधी पाच, इतर मागासवर्गीय चार तर विमुक्त जाती-भटक्या जमाती गटातून एक अर्ज आज दाखल झाला. ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण गटात आठ, अनुसूचित जाती जमाती गटातून एक, तर अडते व व्यापारी गटात चार व हमाल व मापाडी गटातून दोन अर्ज दाखल झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com