पॅकर्स, शिवाजी विद्यापीठतर्फे क्रिकेट प्रशिक्षण शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पॅकर्स, शिवाजी विद्यापीठतर्फे
क्रिकेट प्रशिक्षण शिबीर
पॅकर्स, शिवाजी विद्यापीठतर्फे क्रिकेट प्रशिक्षण शिबीर

पॅकर्स, शिवाजी विद्यापीठतर्फे क्रिकेट प्रशिक्षण शिबीर

sakal_logo
By

पॅकर्स, शिवाजी विद्यापीठतर्फे
क्रिकेट प्रशिक्षण शिबिर
कोल्हापूर, ता. १७ : पॅकर्स क्रिकेट क्लब व शिवाजी विद्यापीठ यांच्यातर्फे ‘कॅच दि यंग’ मोहिमेंतर्गत क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सशुल्क असणारे हे शिबिर शिवाजी विद्यापीठ मैदानावर १३ व १४ वर्षांच्या खेळाडूंसाठी असणार आहे. २५ एप्रिल ते १० मे असे १५ दिवस चालणाऱ्या या शिबिरामध्ये बीसीसीआय लेव्हल तीनचे प्रशिक्षक प्रदीप इंगळे मार्गदर्शन करणार आहे. शिबिरासाठी फक्त २० मुलांची निवड केली जाणार असून या खेळाडूंना शारीरिक क्षमता, मानसिक संतुलन, आहार या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी क्लबशी संपर्क साधण्याचे आवाहन सचिव नंदकुमार बामणे यांनी केले आहे.