कुस्ती

कुस्ती

99057

भाग्यश्री फंड ठरली
‘महिला महाराष्ट्र केसरी’

कोल्हापूरच्या अमृता पुजारीला उपविजेतेपद

कोल्हापूर, ता. २७ : वादग्रस्त ठरलेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत अहमदनगरची भाग्यश्री फंड विजेती ठरली. कोल्हापूरच्या अमृता पुजारीला उपमहाराष्ट्र केसरी किताबावर समाधान मानावे लागले. भारतीय कुस्ती महासंघाच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने दीपाली भोसले-सय्यद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे स्पर्धेचे आयोजन केले होते. राजर्षी शाहू खासबाग मैदानात स्पर्धा झाली.
कोल्हापूरची अमृता विरुद्ध अहमदनगरची भाग्यश्री यांच्यातील अंतिम लढतीत दोघींनी सुरुवातीला एकमेकींची ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला. भाग्यश्रीने एकलंगी डाव टाकून लगेच एकेरी कस काढून दोन गुणांची कमाई केली. त्यानंतर भाग्यश्रीने संथगतीने लढत केल्याने अमृताला एक गुण बहाल करण्यात आला. दुसऱ्या फेरीत दोघींनी तोडीस तोड डाव टाकून गुण मिळवण्याचा प्रयत्न केला. भाग्यश्रीने अमृताला मॅटवर खाली खेचण्याचा सातत्याने प्रयत्न केला. तो अमृताने परतवून लावला. भाग्यश्रीने सावध पवित्रा घेतल्याने पुन्हा अमृताला एक गुण देण्यात आला. दोघींची गुण समान झाले असताना निर्धारित तीन मिनिटांची वेळ संपली. दोन्ही गटांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. अमृताचे प्रशिक्षक दादा लवटे यांनी गुण न दिल्याने आक्षेप घेतला. त्यामुळे मॅटवर गोंधळ झाला. इतक्यात, निवेदकाने भाग्यश्रीला गदा व चारचाकीची किल्ली घेण्यासाठी स्टेजवर बोलावले.
तत्पूर्वीच्या उपांत्य फेरीत भाग्यश्री विरुद्ध सांगलीची प्रतीक्षा बागडी यांच्यात लढत झाली. पहिल्या फेरीत प्रतीक्षाने भाग्यश्रीवर खेमेची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्यातून ती शिताफीने सुटली. यावेळेत भाग्यश्रीने संथगतीने लढत केली. परिणामी, प्रतीक्षाला एक गुण बहाल करण्यात आला. दुसऱ्या फेरीत प्रतीक्षाने एक गुण वसूल केला. प्रतीक्षाने संथगतीने लढत केल्याने भाग्यश्रीला एक गुण देण्यात आला. त्यानंतर प्रतीक्षाने दोन गुण मिळवले. भाग्यश्रीने पुन्हा दोन गुण मिळवल्याने दोघींची गुण समान झाले. अखेरचा गुण भाग्यश्रीने घेतल्याने ती विजयी झाली. कोल्हापूरच्या अमृता पुजारी विरुद्ध कोल्हापूरच्याच वैष्णवी कुशाप्पा यांच्यातील लढतीत अमृताने पहिल्या फेरीत दोन, तर वैष्णवीने एक गुण मिळवला. दुसऱ्या फेरीत अमृताने दोन गुण मिळवले. ही लढत अमृताने जिंकली.
पालकमंत्री दीपक केसरकर व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते भाग्यश्रीला चांदीची गदा व चारचाकीची किल्ली सुपूर्द करण्यात आली. प्रत्येक वजनगटातील विजेत्या पैलवानांना दुचाकी प्रदान करण्यात आली. या वेळी खासदार प्रा. संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, हिंदकेसरी योगेश दोडके, हिंदकेसरी संतोष वेताळ, माजी ऑलिम्पियन बंडा पाटील रेठरेकर, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, पैलवान बाबा महाडिक, संग्राम कांबळे, पैलवान संग्राम पाटील, केरबा चौगुले, कल्पना चौगुले, दिग्विजय चौगुले उपस्थित होते.
अन्य निकाल असा
५० किलो : नेहा चौगुले (कोल्हापूर), श्रुती येवले (पुणे शहर), समृद्धी घोरपडे (सांगली), साक्षी इंगळे (पुणे)
५३ किलो : स्वाती शिंदे (कोल्हापूर), साक्षी चंदनशिवे (सांगली), मेघना सोनुले (कोल्हापूर)
५५ किलो : धनश्री फंड (अहमदनगर), अंजली पाटील (सांगली), स्मिता पाटील (कोल्हापूर), विश्रांती पाटील (कोल्हापूर)
५७ किलो : सोनाली मंडलिक (अहमदनगर), तनुजा जाधव (चंद्रपूर), तन्वी मगदूम (कोल्हापूर), श्रुती बामनावत (संभाजीनगर)
५९ किलो : अंकिता शिंदे (कोल्हापूर), साक्षी पाटील (सातारा), पूजा लोंढे (सांगली), कल्याणी मोहारे (नागपूर)
६२ किलो : सृष्टी भोसले (कोल्हापूर), संजना डिसले (सांगली), सोनिया सरक (सोलापूर), सिद्धी कणसे (सातारा)
६५ किलो : श्रृंखला रत्नपारखी (संभाजीनगर), पल्लवी पाटफोड (पुणे), सिद्धी शिंदे (पुणे), अस्मिता पाटील (कोल्हापूर)
६८ किलो : श्रावणी शेळके (कोल्हापूर), साई शिंदे (पुणे), प्रीतम दाभाडे (पुणे), शिवानी मेटकर (कोल्हापूर)
७२ किलो - वेदांतिका पवार (सातारा), सानिया पवार (अहमदनगर), गायश्री ताटे (कोल्हापूर), वेदिका सासने (कोल्हापूर)
......‌........
दीपाली भोसले-सय्यद म्हणाल्या
- हिंदकेसरी ठाण्यात घेणार
- तीन वेळा महाराष्ट्र केसरी विजेत्यांना क्लास वन नोकरी द्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com