शाहूंना अभिवादन

शाहूंना अभिवादन

00947
कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वाची सांगता शनिवारी झाली. यानिमित्ताने सकाळी दहा वाजता शंभर सेकंद सारे शहर स्तब्ध झाले. टाऊन हॉल परिसरातील राजर्षी शाहू समाधिस्थळ येथे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, यशस्विनीराजे छत्रपती, पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत अभिवादनाचा मुख्य सोहळा झाला. (नितीन जाधव ःसकाळ छायाचित्रसेवा)

लोकराजासाठी जिल्हा स्तब्ध
शंभर सेकंद मानवंदना; अखंड जयघोषासह राजर्षींच्या कार्याचे स्मरण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : राजर्षी छत्रपती शाहू राजांना १०१ व्या स्मृती दिनानिमित्त शंभर सेकंद स्तब्ध राहून मानवंदना देण्यात आली. नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्मारक परिसर लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय, या जयघोषाने दणाणून गेला. शाहूप्रेमींनी शाहू राजांच्या कार्याचे स्मरण केले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार दहा वाजता शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये, विविध शैक्षणिक संस्था, बँका, संस्था, संघटनांची कार्यालयांत अभिवादन करण्यात आले.
जिल्हा प्रशासनातर्फे नर्सरी बागेत मानवंदना देण्यात येणार असल्याने, सकाळी नऊ वाजता नागरिकांनी हजेरी लावली. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी पालकमंत्री व आमदार सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने यांनी समाधीला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर शंभर सेकंद स्तब्ध राहून मानवंदना देण्यात आली.
या प्रसंगी आमदार ऋतुराज पाटील, प्रा. जयंत आसगावकर, प्रकाश आवाडे, पी. एन. पाटील, राजेश पाटील, मधुरिमाराजे छत्रपती, यशस्विनीराजे छत्रपती, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील उपस्थित होते.
राजर्षी शाहू सलोखा मंचतर्फे शाहू राजांच्या राजपोशाखातील दहा हजार प्रतींचे वाटप करण्यात आले. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, पालकमंत्री केसरकर, उच्च तंत्र शिक्षण मंत्री पाटील, मंचचे निमंत्रक वसंतराव मुळीक, बबनराव रानगे यांच्या हस्ते वाटप झाले. या वेळी अनंत म्हाळुंगेकर, दिलीप पवार, हसन देसाई, शशिकांत पाटील, उत्तम जाधव, कादर मलबारी, संजय कांबळे, उदय देसाई, सुनील कानूरकर, बाबूराव बोडके, महेश मचले, मनोज नरके, शैलजा भोसले उपस्थित होते.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी संयोजन समितीतर्फे सर्व जाती-धर्मात एकोपा टिकावा, यासाठी प्रतिज्ञा घेण्यात आली. अनिल चव्हाण, अतुल दिघे, बाबूराव कदम, गिरीश फोंडे, प्रशांत आंबी, रमेश वडणगेकर, आरती रेडेकर, हरिष कांबळे, बी. एल. बरगे, धीरज पठारे, मीना चव्हाण उपस्थित होते.
-------------
चौकट
समाधिस्थळी दिवसभर लगबग
दरम्यान, शाहू समाधीवर पुष्पहार अर्पण करण्यासाठी दिवसभर शाहूप्रेमींची लगबग होती. ग्रामीण भागातील विविध संस्था, संघटना, मंडळाचे पदाधिकारी येथे आले होते. मोबाईल कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रे टिपली जात होती.
-----------
दृष्टीक्षेपात
- एस.टी. बसगाड्या चौकाचौकात थांबल्या
- शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून अभिवादन
- व्यापारी, उद्योजक, विक्रेते, बँकांमधील ग्राहक, प्रवासी, शाळा, महाविद्यालयांचा उपक्रमात सहभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com