बाराशे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या

बाराशे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या

जिल्हा परिषद ...
...

बाराशे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या

९३ टक्के गुरुजींना पसंतीची शाळा

कोल्हापूर, ता.८: बहुचर्चित जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील १२०९ शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे ९३ टक्के शिक्षकांना पसंतीच्या शाळा मिळाल्या आहेत. एकूण १३४३ शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केले होते.
यापैकी १३४ शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नाहीत. शिक्षण विभागाने मेलवर बदली आदेश पाठवले आहेत. या शिक्षकांना १६ ते २६ मे पर्यंत कार्यरत शाळेतून कार्यमुक्त केले जाणार आहे.

राज्यातील महाविकास आघाडी शासनाने जिल्हा परिषदेकडील शिक्षक बदलीचे अधिकार काढून घेतले. राज्याच्या शिक्षण विभागाने शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांची प्रक्रीया राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिक्षकांना ऑनलाईन अर्ज करण्याची सूचना केली. यात संबंधित शिक्षकांच्या पसंतीच्या १० शाळा भरण्यास परवानगी देण्यात आली. अर्ज केलेल्या बहुतांश शिक्षकांना त्यांची पसंतीची शाळा देण्यात आली आहे.

बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांची सेवा सर्वसाधारण अर्थात सुगम शाळेत १० वर्षे झाली आहे त्यांना थेट दुर्गम शाळेवर पाठवण्यात आले आहे. तर ५६ शिक्षकांची अंतरजिल्हा बदली करण्यात आली आहे. तर जिल्ह्याबाहेर गेलेले ४८ शिक्षक स्वगृही परतले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com