Fri, Sept 22, 2023

शाळकरी मुलीची आत्महत्या
शाळकरी मुलीची आत्महत्या
Published on : 14 May 2023, 6:22 am
शाळकरी विद्यार्थ्यांनीची आत्महत्या
कोल्हापूर : राहत्या घरी गळफास घेऊन शाळकरी विद्यार्थिनीने आत्महत्या केली. अदिती सुरेश खाडे ( वय १६, रा. कासारवाडी, ता. हातकणंगले) असे तिचे नाव आहे. रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याची नोंद सीपीआर पोलीस ठाण्यात झाली. रविवारी दुपारी अदितीने राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना वडिलांच्या निदर्शनास आली. त्यांनी अदितीचा गळफास सोडवून तिला तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.