उद्योजक बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्योजक बैठक
उद्योजक बैठक

उद्योजक बैठक

sakal_logo
By

‘हातकणंगले’ मतदारसंघ इंडस्ट्रियल कॉरिडॉर करणार
खासदार धैर्यशील माने; जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

कोल्हापूर ता. १८ : कोल्हापूरच्या औद्योगिक विकासावर शासनाचा अधिक भर असून, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात अधिकाधिक औद्योगिक वसाहती विकसित करून हा परिसरात इंडस्ट्रियल कॉरिडॉर म्हणून विकसित करणार असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी आज सांगितले.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात नव्याने स्थापन होणाऱ्या औद्योगिक वसाहतींच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीत ते बोलत होते.
खासदार माने म्हणाले, ‘शाहूवाडी- पन्हाळा तालुक्यात 1250 एकरावर औद्योगिक वसाहतींना शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये डोणोली- आवळी या परिसरात 750 एकर तर साताळीदेवी पठारावर 500 एकरामध्ये या औद्योगिक वसाहती विकसित करण्यात येत आहेत. या वसाहती रत्नागिरी-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाशी कनेक्ट राहतील. येथे सर्व पायाभूत सुविधा देण्याबरोबरच उद्योजकांना आवश्यक मनुष्यबळाची निर्मितीचा प्रकल्पही राबविणार आहे. जिल्ह्यातील उद्योजकांनी तसेच औद्योगिक संघटनांनी नवनवे उद्योग उभारण्यात पुढाकार घ्यावा. साताळीदेवी औद्योगिक वसाहत मोठ्या औद्योगिक उद्योगासाठी राखून ठेवण्याबाबतही विचार केला जाईल. जिल्ह्यात वर्षभरात नव्याने आठ औद्योगिक वसाहती शासनाने मंजूर केल्या आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, ‘जिल्ह्यात गेल्या वर्षभरात नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या औद्योगिक वसाहतीमध्ये विकासवाडी (ता. करवीर) येथे 265 हेक्टरवर औद्योगिक वसाहत प्रस्तावित केली आहे. आकिवाट सैनिक टाकळी परिसरात 75 हेक्टरवर, राधानगरी तालुक्यात कौलव येथे 15 हेक्टरवर, हेर्ले येथे 43 हेक्टरवर, साताळीदेवी येथे 500 एकरावर, डोणोली-आवळी येथे 305 हेक्टरवर, जांभळी येथे 43 हेक्टरवर तर मजले-तमदलगे परिसरात 50 ते 60 हेक्टरवर नव्या औद्योगिक वसाहतींना मान्यता मिळाली आहे. जिल्ह्याच्य औद्योगिक विकासाला सहाय्यभूत ठरेल असे एक्झीबिशन सेंटर उभारण्याचा मानस आहे.’
औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे म्हणाले, ‘जिल्ह्यात नव्याने होणाऱ्या सात औद्योगिक वसाहतींच्या दर्जेदार विकासासाठी येथील उद्योजकांनी पुढाकार घ्यावा.’
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, प्रांताधिकारी समीर शिंगटे, शाहुवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण, केईएचे अध्यक्ष दिनेश बुधले, मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोंगे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे, स्मॅकचे अध्यक्ष दीपक पाटील, मेनन ग्रुपचे सचिन मेनन, आयआयएफचे अध्यक्ष सचिन शिरगावकर, गोशिमाचे अध्यक्ष दीपक चोरगे, मॅकचे संजय पेंडसे, गोशिमाचे मोहन पंडितराव, श्री. कुलकर्णी, राजेंद्र माळी उपस्थित होते.

चौकट
‘शासनस्तरावर, राजकीयदृष्ट्या प्रयत्न व्हावेत’
नव्या औद्योगिक वसाहतीमध्ये आपापले उद्योग विकसित करण्यासाठी सक्रिय राहू तसेच या परिसरात मोठ्या औद्योगिक कंपन्या याव्यात या दृष्टीनेही शासनस्तरावर आणि राजकीयदृष्ट्या प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा उद्योजकांनी व्यक्त केली.