होळकर पुण्यतिथी

होळकर पुण्यतिथी

12866

कोल्हापूर : सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करताना महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ व मल्हार सेना युवक संघटनेचे कार्यकर्ते.
...

धनगर समाज महासंघातर्फे
मल्हारराव होळकर यांना अभिवादन

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ व मल्हार सेना युवक संघटनेतर्फे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सुनील खांडेकर व अर्जुन थोरबोले यांच्या हस्ते होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे यांनी होळकर यांच्या पराक्रमाची माहिती दिली. अटकेपार मराठेशाहीचा विस्तार करुन छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे दिल्लीच्या तख्तावर भगवा झेंडा फडकवण्याचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले, असे सांगितले. यावेळी छगन नांगरे, महासंघाचे जिल्हाध्यक्ष राघू हजारे, बाबूराव बोडके, बाबूराव एडके, दगडू जानकर, विठ्ठल शेळके, बाळासाहेब कोळेकर, उदय देसाई, सिद्धू यमकर, बबन कात्रट उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com