बारावी निकाल

बारावी निकाल

04978
कोल्हापूर ः बारावीचा निकाल गुरुवारी दुपारी ऑनलाईन जाहीर झाला. उत्तीर्ण झाल्याचे समजताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. कुठे फटाके फुटले, तर कुठे गुलालाची अशी उधळण करत आनंदोत्सव साजरा झाला. (बी. डी. चेचर ः सकाळ छायाचित्रसेवा)

वाढावा पान
04979
कोल्हापूर ः बारावीचा निकाल गुरुवारी दुपारी ऑनलाईन जाहीर झाला. निकालाची प्रत मिळवण्यासाठी इंटरनेट कॅफेमध्ये अशी धांदल उडाली.

कोल्हापूर विभाग राज्यात तिसरा
बारावी उत्तीर्णांमध्ये मुलींची बाजी, जिल्ह्याचा निकाल ९३.८९ टक्के
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.३ : बारावीच्या निकालात यंदा कोल्हापूर विभाग राज्यात तिसऱ्या क्रमांकावर राहिला. कोल्हापूर विभागाचा निकाल ९३.२८ टक्के असून, मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.३५, तर मुलांचे ९०.५८ टक्के आहे. विभागात कोल्हापूर जिल्ह्याने पहिला, सातारा दुसरा व सांगलीने तिसरा क्रमांक पटकावला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालात १.७९ टक्के घट आहे. दरम्यान, राज्यात कोकण विभाग पहिला, तर पुणे विभाग द्वितीय ठरला. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे निकाल आज जाहीर केला.

विद्यार्थ्यांना कोरोना काळात लेखी परीक्षेला सामोरे जावे लागले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शाळा, महाविद्यालये नियमित सुरू झाली. कोरोना काळात लिखाणाची सवय कमी झाल्याचे चित्र बारावीच्या निकालात ठळकपणे दिसून आले आहे. त्यातून निकालात घट झाल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांसह पालकांत निकालाबाबत मोठी उत्सुकता होती.

दुपारी एकपासूनच ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी नेट कॅफेत विद्यार्थ्यांची गर्दी होती. काही जण पालकांसमवेत लॅपटॉप, तर अन्य मोबाईलवर शिक्षण मंडळाने दिलेली वेबसाईट कधी उघडते, याची वाट पाहत होते. निकाल जाहीर झाल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. पालकांनीही पेढे भरवून कौतुक केले.
विभागातून एक लाख १८ हजार ३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पैकी एक लाख १० हजार ११० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेत सातारा जिल्ह्यात १०, सांगली ६ व‌ कोल्हापूर जिल्ह्यात एक विद्यार्थ्याने गैरमार्गाचा अवलंब केल्याने त्यांची त्या विषयातील संपादणूक रद्द करण्यात आली.

* जिल्हानिहाय टक्केवारी
* कोल्हापूर : ९३.८९
* सातारा : ९२.८७
* सांगली‌ : ९२.८१

* शाखा * उत्तीर्ण * टक्केवारी
* विज्ञान ‌ * ५७, ३९९ * ९८.१३
* कला * २६, २२० * ८२.९४
* वाणिज्य * २१, ७३१ * ९४.७६
* व्यावसायिक * ४, १६५ * ९५.११
* आयटीआय * ५९४ * ९६.४३

निकालाबाबत विद्यार्थ्यांना काही तक्रारी असतील तर त्यांच्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. गुण पडताळणीसाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध आहे.
- डी. एस. पोवार, विभागीय सचिव, कोल्हापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com