देणगीतील पारितोषिकाने गुणवंतांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देणगीतील पारितोषिकाने गुणवंतांचा सन्मान
देणगीतील पारितोषिकाने गुणवंतांचा सन्मान

देणगीतील पारितोषिकाने गुणवंतांचा सन्मान

sakal_logo
By

लोगो ः डेटा स्टोरी
..................................................
लोगो ः विद्यापीठ
-
देणगीतील पारितोषिकाने गुणवंतांचा सन्मान


संतोष मिठारी
कोल्हापूर, ता. २६ ः शिवाजी विद्यापीठातून शिक्षण घेवून अनेकांनी यशस्वी करिअर घडविले आहे. अशा माजी विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान करण्यासाठी विद्यापीठाला आपल्यापरीने देणगी दिली आहे. त्यातून विद्यापीठ दरवर्षी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील सुमारे १२८ गुणवंत विद्यार्थ्यांचा परितोषिक देवून सन्मान करते. विविध स्वरूपातील शिष्यवृत्तींच्या माध्यमातून ६२६ विद्यार्थ्यांच्या आर्थिक पाठबळ देत शिक्षणाला आधार देत आहे.
विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षान्त समारंभापासून देणगीतून पारितोषिक देणे सुरू झाले. वर्षागणिक देणगीची रक्कमेबरोबर पारितोषिकांची संख्या वाढली. सध्या २ कोटी १२ लाख रूपयांच्या देणगीवरील व्याजातून पारितोषिके देण्यात येतात. दरवर्षी विविध सहा घटकांअंतर्गत विद्यापीठ विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्तींव्दारे मदतीचा हात देते.
.....
कोट
विद्यापीठाकडून गुणवंतांना शिष्यवृत्ती दिली जाते. देणगीच्या माध्यमातून सुरू केलेल्या पारितोषिकांच्या रक्कमेतूनही विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य मिळते. मात्र, काळाच्या ओघात पैशांचे मूल्य कमी होत चालले आहे. ते पाहता पारितोषिकाची रक्कम कमी वाटते. पण, या पारितोषिकांना मोठी परंपरा आहे. त्यामुळे पारितोषिकांच्या रक्कमेपेक्षा गुणवंतांचा होणारा सन्मान मोलाचा आहे.
-डॉ. विलास शिंदे, प्रभारी कुलसचिव
........
१२८४ विद्यार्थ्यांना सरकारची स्कॉलरशीप, फ्रीशीप
गेल्यावर्षी केंद्रसरकारची शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर, ओबीसी, पोस्ट मॅट्रिक एसबीसी, व्हीजेएनटी शिष्यवृत्तीसाठी १ हजार १११ विद्यार्थी पात्र ठरले. त्यांना ४ कोटी ८६ लाख २ हजार ८९ रूपये इतकी शिष्यवृत्ती मंजूर झाली. मॅट्रिकोत्तर, फ्रीशीप, ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी फ्रीशीप १७३ विद्यार्थ्यांना मिळाली. त्याची रक्कम १ कोटी ८० लाख ४ हजार २४६ इतकी आहे.
.......................................................................................................
सहा वर्षांतील पारितोषिकांची संख्या
वर्ष* पारितोषिकांची संख्या* रक्कम
२०१७*१२५*३९६७००
२०१८*१२५*३९६५५०
२०१९*१२८*४९३१६७
२०२०*१२८*४७७६४३
२०२१*११४*५१७१००
२०२२*११७*३२९५१३
---
गोल्डन ज्युब्ली रिसर्च स्कॉलरशीप
वर्ष* वितरीत रक्कम
२०१५*७५११०३
२०१६*१०९३६५८
२०१७*१५३०२२३
२०१८*४१११२६९
२०१९*३३४०४१०
२०२०*३२३०२४७
२०२१*२०७४३४१
२०२२*२५१६०१६