२२९ शिक्षक बनले मुख्याध्यापक

२२९ शिक्षक बनले मुख्याध्यापक

२२९ शिक्षक बनले मुख्याध्यापक

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या २२९ शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्यात आली. बुधवारी शाहू सभागृहात पदस्थापना आणि पदोन्नती प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषदेकडे मुख्याध्यापक पदाची २७८ पदे रिक्त होती. यातील १८ दिव्यांग शिक्षकांना पहिल्या टप्प्यात पदोन्नती देण्यात आली. त्यानंतर ३१ मे रोजी निवृत्त होणाऱ्या ३१ जणांना पदस्थापनेसह मुख्याध्यापक पदावर पदोन्नती दोन दिवसांपूर्वी देण्यात आली.
यानंतर २२९ जणांना पदस्थापना देण्यासाठी समुपदेशन प्रक्रिया राबवण्यासाठी पात्र ४१० जणांना बुधवारी जिल्हा परिषदेत पाचारण करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यावेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com