समिती तुकडी रवाना

समिती तुकडी रवाना

कोल्हापूर : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीची अन्नछत्राची तुकडी भवानी मंडप येथून रायगडाच्या दिशेने रवाना झाली.
....

अन्नछत्राची तुकडी रायगडला रवाना

कोल्हापूर : ‘जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या जयघोषात अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीची अन्नछत्राची पहिली तुकडी रायगडाच्या दिशेने रात्री उशिरा रवाना झाली. समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली पाच व सहा जूनला सोहळ्याचे आयोजन केले आहे. यंदा शिवराज्याभिषेकास ३५० वे वर्ष सुरू होत आहे. वर्षभर वैविध्यपूर्ण साजरा केला जाणार आहे. त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्याच्या नियोजनासाठी समितीची पहिली तुकडी भवानी मंडप येथून रवाना झाली. ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, कार्याध्यक्ष हेमंत साळोखे, विनायक फाळके, संजय पोवार, उदय घोरपडे, प्रसन्न मोहिते, प्रवीण हुबाळे, गणी आजरेकर, राहुल शिंदे, अजय पाटील, गौरव सूर्यवंशी, देवेंद्र भोसले, संतोष पोवार-देसाई उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com