अल्पवयीन मुलीस पळवले

अल्पवयीन मुलीस पळवले

अल्पवयीन मुलीस पळवले

नागरिकांचा करवीर पोलिस ठाण्यासमोर जमाव

कोल्हापूर, ता. ३ : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या मुलावर ‘पोक्सो‘ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यासाठी हजारो नागरिकांचा जमाव करवीर पोलिस ठाण्यासमोर जमला. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, पण पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हा जमाव येथून गेला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी , करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली होती. तिच्या पालकांनी करवीर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी संबंधित तरुणावर ‘ पोक्सो‘ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करावी, या मागणीसाठी शनिवारी रात्री उशिरापर्यंत कसबा बावडा भगवा चौकानजीकच्या करवीर पोलिस ठाण्याच्या दारात जमाव जमला होता. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी जमावाची समजूत काढून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव तेथून हटला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com