कुरुंदवाडला बसवेश्‍वर जयंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुरुंदवाडला बसवेश्‍वर जयंती
कुरुंदवाडला बसवेश्‍वर जयंती

कुरुंदवाडला बसवेश्‍वर जयंती

sakal_logo
By

02570
कुरुंदवाड : महात्मा बसवेश्‍वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना समाजबांधव.

कुरुंदवाडला बसवेश्‍वर जयंती
कुरुंदवाड : येथे महात्मा बसवेश्‍वर जयंती सोहळा उत्साहात झाला. यानिमित्त श्री कल्लेश्वर महाराजांच्या पिंडीला महाभिषेक घालण्यात आला. या कार्यक्रमाचे पौरोहित्य ओंकार जंगम यांनी केले. बसव प्रतिमेचे पुजन करण्यात आले. तसेच बसवेश्‍वर चौक फलकाचे पुजन करुन स्वातंत्र्य सेनानी श्रीपालकाका आलासे अर्बन बँकेचे अध्यक्ष अरुण आलासे आणि लिंगायत समाज ट्रस्टचे अध्यक्ष सदाशिव मगदुम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कल्लेश्वर मंदिरात रांगोळी स्पर्धा झाल्या. यात प्रथम-प्रियांका व्होरा, द्वितीय-प्रेमिला कुंभार, तृतीय-सोनाली माळी, उत्तेजनार्थ -सानिया कवठेकर, सुप्रिया व्होरा, रेणुका आवटी. विशेष पुरस्कार-पारस जनवाडे, सहभागिता पुरस्कार-आकांक्षा पोतदार, भाग्यश्री मगदुम यांनी यश मिळविले. कार्यक्रमास बसवण्णा सामाजिक सेवा प्रतिष्ठान, अक्कमहादेवी महिला भजनी मंडळ, श्री शिवशक्ती कला, क्रीडा सांस्कृतिक मंडळ, लिंगायत समाज ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि कुरुंदवाड शहरातील सर्वा प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Krw22b01739 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top