पंचगंगा प्रदुषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंचगंगा प्रदुषण
पंचगंगा प्रदुषण

पंचगंगा प्रदुषण

sakal_logo
By

१९७७३
19774

तेरवाड बंधाऱ्यात काळेकुट्ट पाणी
प्रदूषणाचा विळखा घट्ट; पाण्याला उग्र वास; जलचरांची फडफड
कुरुंदवाड, ता. ५ ः पंचगंगा नदीपात्रात काळेकुट्ट पाणी आले असून तेरवाड (ता. शिरोळ) येथील बंधाऱ्याला जलपर्णीचा विळखा घट्ट होत आहे. बंधाऱ्यात दोन-तीन दिवसांपूर्वी काळेकुट्ट पाणी आले होते. जलपर्णीमुळे बंधारा परिसरात पाणीच दिसत नाही; मात्र बरग्यामधून काळेकुट्ट पाणी फेसाळत बाहेर पडत आहे. पाण्याला दुर्गंधी असून रसायनमिश्रित पाण्यामुळे जलचर पात्रात मृत झाले असल्यानेच पाण्याला उग्र वास येत आहे.
दरम्यान, कोल्हापूरपेक्षा इचलकरंजी येथील काळ्या ओढ्यातून येणारे पाणी थेट पंचगंगेत मिसळत असल्याने पाणी काळपट बनले असून काळ्या ओढ्यातील पाण्याचा एकदाचा बंदोबस्त करा. तिथेच प्रदूषणाचे मूळ असल्याचे पंचगंगा काठावरील जनतेचे मत आहे. दरम्यान, दोन महिन्यांपासून पंचगंगा पात्रात पसरत चाललेल्या जलपर्णीने बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूचा एक किलोमीटरचा परिसर व्यापला आहे. जलपर्णी कुजत असल्याने त्याचीही दुर्गंधी पसरली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Krw22b01740 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top