मजरेवाडी हाणामारी २४ जणावर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मजरेवाडी हाणामारी २४ जणावर गुन्हा दाखल
मजरेवाडी हाणामारी २४ जणावर गुन्हा दाखल

मजरेवाडी हाणामारी २४ जणावर गुन्हा दाखल

sakal_logo
By

फोटो येणार आहे........
मजरेवाडीत दोन गटांत हाणामारी
दगडफेकही; २३ जणांवर गुन्हे, निवडणूक वाद उफळला, गावात तणाव

सकाळ वृत्तसेवा
कुरुंदवाड, ता.७ ः मजरेवाडी (ता. शिरोळ) येथे पालखी मिरवणुकीसमोर फटाके उडवण्याच्या कारणावरुन दोन गटांत राडा झाला. एकमेकांच्या अंगावर धावून शिवीगाळ झाली. त्यानंतर हाणामारी व दगडफेकीस सुरुवात झाल्याने गावात प्रचंड तणाव निर्माण झाला. दिवसभर वातावरण तणावपूर्णच होते. या प्रकरणी पोलिसांनीच फिर्याद दाखल केली असून २३ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. दोन्ही गटांतील काही कार्यकर्त्यांनी नंग्या तलवारी आणून दहशत माजवल्य‍ाची चर्चा आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीपासून दोन गटांत वाद धुमसत आहे. त्याचेच पर्यवसान आज हाणामारीत झाल्याची चर्चा आहे. होळकर चौकात साहेब ग्रुप व सरकार प्रेमी ग्रुपमधे वाद झाला. पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. दिवसभर गावातील प्रमुख मंडळी पोलिस ठाण्यात गर्दी करुन थांबून होते. दोन्ही गटांकडून मिटवामिटवीसाठी प्रयत्न सुरू होते; मात्र पोलिसांसमोरच हाणामारी झाल्याने अखेर रात्री उशिरा पोलिस नाईक राजेंद्र पवार यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा मजरेवाडी येथील किशोर बाळासो जुगळे, संतोष सुधाकर चव्हाण, राजेंद्र मारुती गायकवाड, कुमार अण्णासाहेब पाटील, चिदानंद आप्पासो पाटील, प्रथमेश शिवाजी खराडे, अमोल बाळासो जुगळे, अभिषेक सदाशिव बदामे, रणजित अरुण माळी, प्रशांत सदाशिव माळी, सुशांत सदाशिव माळी, किशोर सुधाकर चव्हाण, अजिंक्य दिनकर नरुटे, शेखर दत्तात्रय कागले, शेखर गणेश ढवळे, पवन अजय माळी, विनायक चंद्रकात कारंडे, अभिजित संजय इंगळे, विश्वजित संजय इंगळे, सूरज आनंदा कागले, नरसू विठ्ठल गायकवाड, अमित दिनकर नरुटे, ऋतिक राजेंद्र कागले (सर्व रा. मजरेवाडी) अशा २३ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ः मजरेवाडी येथे एका मंडळात ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान सरकार व साहेब ग्रुप असे दोन गट पडले. गावात लक्ष्मी देवीची यात्रा सुरू असून शनिवारी रात्री अडीच वाजता सुमारास देवीची पालखी मिरवणूक सरकार-साहेब चौकात आल्यानंतर एका गटाने फटाके उडवत असताना त्यांना दुसऱ्या गटाने मज्जाव केला. त्याने दोन्ही गटांत वादावादी सुरू झाली. त्याचे हाणामारी आणि दगडफेकीत रूपांतर झाले. पहाटे चार वाजता काही युवकांनी सरकार ग्रुपच्या आयलँडवर हल्ला चढवत तोडफोड करून फरश्या फोडल्या. पुन्हा वादावादीला सुरवात झाली. काही ग्रामस्थांनी पोलिस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली असता घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे, अमित पाटील यांनी धाव घेऊन जमाव पांगवला.
चौकट
युवतीसह दोघे जखमी
हाणामारी, दगडफेकीवेळी राजेंद्र कागले यांच्या डोकीस मार बसला. दगडफेक, दंगा सुरू झाल्याचे ऐकून आपल्या वडिलांना घेण्यासाठी आलेल्या एका युवतीच्या पायाला दगड लागला आहे. दोघांवर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Krw22b01744 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top