शीघ्र कृती दलाचे कुरुंदवाडमध्ये संचलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शीघ्र कृती दलाचे कुरुंदवाडमध्ये संचलन
शीघ्र कृती दलाचे कुरुंदवाडमध्ये संचलन

शीघ्र कृती दलाचे कुरुंदवाडमध्ये संचलन

sakal_logo
By

02587

---
शीघ्र कृती दलाचे कुरुंदवाडमध्ये संचलन
कुरुंदवाड, ता. १० ः कुरुंदवाड शहर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सध्या सुरू असलेल्या यात्रा जत्रा शांततेत पार पडाव्यात. अनुचित प्रकार घडल्यास त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आणि संभाव्य महापुरावर तातडीने उपाययोजना राबवता याव्यात, पूरग्रस्तांना सुखरूप बाहेर काढता यावे यासाठी भौगोलिक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नवी मुंबईच्या १०२ बटालियन आर ए पी शीघ्र कृती दलाच्या सशस्त्र जवानांनी संचलन केले.
दलाच्या तुकडीत ६५ जवान आहेत. २ पोलिस निरीक्षक, २ सहाय्यक पलिस निरीक्षक आणि ५ उपनिरीक्षक, ४० पोलिस कर्मचारी संचलनात सहभागी झाले होते.
राज्यात सध्या मशिदीच्या भोंग्यावरून वातावरण तापले आहे. ग्रामीण भागतील यात्रा-जत्रा-उरूस सुरू आहेत. यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ३५ वज्रा अश्रूधूर, सशस्त्र असणाऱ्या वाहनातून असिस्टंट कमांडर दीपक कृमार गुरवे, पोलिस निरीक्षक रामसिंग मिना यांनी जवानासह संचलन केले. महापुरा दरम्यान नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्यांची पाहणी करून भौगोलिक क्षेत्राचा आढावा घेतला.
शहरातील दर्गा चौक रस्ता, सन्मित्र चौक, माळभाग, बागवान गल्ली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पालिका चौक, पलिस ठाणे या मार्गावरून सशस्त्र संचलन केले. कुरुंदवाड पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील दत्तवाड, मजरेवाडी, राजापूर, खिद्रापूर येथे दंगल काबूची प्रात्यक्षिके करण्यात येणार असल्याची माहिती निरीक्षक मीना यांनी दिली. संचलनात सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे, उपनिरीक्षक अमित पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक विजय घाटगे, फारूक जमादार,अरुण वटारे, शहाजी फोंडे आदी सहभागी झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Krw22b01750 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top