हेरवाड पदाधिकारी मुंबईत सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हेरवाड पदाधिकारी मुंबईत सत्कार
हेरवाड पदाधिकारी मुंबईत सत्कार

हेरवाड पदाधिकारी मुंबईत सत्कार

sakal_logo
By

02594
मुंबई ः येथे हेरवाड ग्रामपंचायत पदाधिकारी यांचा महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सत्कार केला.


विधवा प्रथा बंद कायद्यासाठी प्रयत्न
मंत्री हसन मुश्रीफ; हेरवाड सरपंच पाटील, सदस्यांचा मुंबईत सत्कार

कुरुंदवाड, ता. १२ ः हेरवाड पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यासाठी ३१ मे रोजी होणाऱ्या अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ग्रामपंचायतीला परिपत्रक काढून विधवा प्रथा बंद कायदा अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. हेरवाड (ता.शिरोळ) ग्रामसभेने घेतलेल्या क्रांतिकारी निर्णयाची राज्यातील मंत्रिमंडळाकडून दखल घेतली. आज महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर व खासदार सुप्रिया सुळे यांनी हेरवाडचे सरपंच सुरगोंडा पाटील आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा मुंबई येथे सत्कार केला. त्यावेळी मंत्री मुश्रीफ बोलत होते.
४ मे रोजी झालेल्या गावसभेत हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदचा ऐतिहासिक ठराव केला. या ऐतिहासिक निर्णयाची दखल थेट मंत्र्यांनी घेतली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील-यड्रावकर आदींनी हेरवाडकरांचे कौतुक केले. मंत्री यड्रावकर यांनी या निर्णयाबद्दल हेरवाड गावाला ५० लाखांचा निधी जाहीर केला. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही महिलांच्या विकासासाठी ११ लाखांचा निधी जाहीर केला.
मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, विधवा महिलांसंदर्भात असलेले धोरण अजून अर्धवट आहे. त्यात बदल करून विधवा महिला प्रथा बंदसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Krw22b01753 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top