विधवा महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विधवा महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रयत्न
विधवा महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रयत्न

विधवा महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रयत्न

sakal_logo
By

02642


विधवांच्या सक्षमीकरणाचा प्रयत्न
चित्रा वाघ; हेरवाड येथे विधवा प्रथा बंदीच्या निर्णयाबद्दल सत्कार समारंभ
कुरुंदवाड, ता. २५ ः विधवा प्रथा बंद करून राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा हेरवाडने पुढे नेण्याचे काम केले आहे. या विधवांच्या सक्षमीकरणाची आवश्यकता असून यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्रिमंडळातून विधवांसाठी विविध योजना राबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले. हेरवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायत प्रांगणात विधवा प्रथा बंदीच्या निर्णयाबद्दल सत्कार समारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, विजय भोजे, अशोकराव माने, राजवर्धन नाईक निंबाळकर आदी प्रमुख उपस्थित होते.
सौ. वाघ म्हणाल्या, ‘‘कोल्हापूर जिल्ह्याला राजर्षी शाहूंच्या विचार व कृतिशीलतेची परंपरा आहे. हेरवाड गावाने घेतलेला विधवा प्रथेला बंदीचा निर्णय दिशादर्शक आहे.’’
सौ. महाडिक म्हणाल्या, ‘‘विधवा प्रथा बंद झाली हे स्वागतार्ह आहे. असे ठराव गावोगाव होताहेत मात्र फक्त ठराव करून परिपत्रके काढून चालणार नाही, याचे विचार समाजात रुजवणे गरजेचे आहे. याचा प्रचार आणि प्रसार गावात झाला पाहिजे.’’ राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी हेरवाडला १० लाखांचा निधी जाहीर केला. स्वागत सरपंच सुरगोंडा पाटील यांनी केले. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व विधवा प्रथेला मूठमाती देणाऱ्‍या तुळसाबाई गायकवाड, कविता नाईकवाडे यांचा सत्कार केला. भाजप प्रभारी सोनाली मगदूम, जोत्स्ना यादव, संगीता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
भाजप जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष पृथ्वीराज यादव, आर. बी. पाटील, वैशाली पाटील, औरंग शेख, मयुर खोत आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Krw22b01783 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top