टुडे ३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे ३
टुडे ३

टुडे ३

sakal_logo
By

02692
कुरुंदवाड ः येथे कर्जमाफी आदेशाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी होळी केली.

कुरुंदवाडला कर्जमाफी आदेशाची होळी
स्वाभिमानी संघटनेतर्फे रास्ता रोको; महाविकास आघाडीने फसवणूक केल्याचा आरोप

कुरुंदवाड, ता. २५ ः येथे २०१९ मध्ये महापुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई घेतलेल्या नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मिळणार नाहीत, असा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील शिवतिर्थावर रास्ता रोको आंदोलन करीत शासनाच्या आदेशाची होळी करून संतप्त भावना व्यक्त केल्या. महाविकास आघाडीने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करीत आंदोलकांनी घोषणाबाजी केली. अण्णासाहेब चौगुले म्हणाले की, प्रोत्साहन योजनेच्या लाभासाठी जे निकष जाहीर केले आहेत, यात २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या कालावधीत बँक अथवा संस्थेकडून घेतलेले कर्ज पात्र असेल. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह १३ जिल्ह्यांत २०१९ मधील पूरस्थितीत पीक कर्ज आणि त्यावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना दुबार लाभ दिला जाऊ नये, यामुळे या दोन निकषांमुळे जिल्ह्यातील सुमारे ९० टक्के शेतकरी अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे ही कर्जमाफी योजना फसवी असून शासनाने त्वरित निर्णय बदलावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल. मंत्र्यांना मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
विश्वास बालिघाटे म्हणाले की, जिल्ह्यात उसासाठी जे पीक कर्ज घेतले जाते त्याला १५ महिन्यांची मुदत असते. त्यामुळे सलग तीन वर्षांच्या निकषात हे शेतकरी बसत नाहीत. हे निकष मान्य करणार नाही. या योजनेसाठी १० हजार कोटींची तरतूद केली आहे, त्याला कात्री लावू देणार नसल्याचा इशारा दिला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आल्याने कुरुंदवाड -नृसिंहवाडी मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी कुरुंदवाड पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता. यावेळी माजी सभापती सुवर्णा अपराज, बंडू उमडाळे, योगेश जिवाजे, विशाल चौगुले, अविनाश गुदले, निंगोडा पाटील, बंडू पाटील, रघू नाईक, दिलीप माणगांवे, भूपाल कुंभोजे, ध्रुव रूकडे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Krw22b01817 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top