जुगार अड्ड्यावर छापा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुगार अड्ड्यावर छापा
जुगार अड्ड्यावर छापा

जुगार अड्ड्यावर छापा

sakal_logo
By

दत्तवाडमध्ये जुगार अड्ड्यावर
छाप्यात १४ जणांना घेतले ताब्यात
कुरुंदवाड ः दत्तवाड (ता. शिरोळ) येथील तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून रोकड मोबाईल, दुचाकी असा १ लाख ११ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चौदा जणांना ताब्यात घेतले. दत्तवाड येथील सरकारी दवाखान्यासमोर एका इमारतीत आजीम काले पैसे लावून तीन पानी पत्त्याचा जुगार खेळवत असताना पोलिसांनी छापा टाकला. छाप्यात सुनील चिगरे, प्रेमकुमार पवार, उमेश पाटील, निर्माण कांबळे, स्वरूप कमते, दादासो धुमाळे, अल्ताफ काले, अजीम काले, सुहेल काले, अजिंक्य पवार (सर्व दत्तवाड, ता. शिरोळ), आकाश वडर, विठ्ठल निर्मळे, तेजस चिगरे, ऋषीकेश वडर (चौघे रा. टाकळीवाडी, ता. शिरोळ) अशा चौदा जणांना पकडले. अड्ड्यावरून १० हजार ७०० रोकड, ६६ हजारांचे मोबाईल, ३५ हजारांची मोटारसायकल असा एकूण १ लाख ११ हजार ७२० रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.


3502
शेडशाळच्या एकाला सक्तमजुरी
शिरोळ ः अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून लैंगिक अत्याचार करणाऱ्या शेडशाळमधील एकाला न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. मारुती वेंकप्पा मिरजकर असे आरोपीचे नाव आहे. २८ फेब्रुवारी २०१८ रोजी पीडित मुलीच्या घरी जाऊन तिच्याशी चाळे करून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मिरजकर यांच्यावर केला होता. याबाबत शिरोळ पोलिसांत मिरजकर विरोधात गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक पी. बी. रुग्गे यांनी दोषारोप सादर केले होते. जयसिंगपूर येथील सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे पाच साक्षीदारांचा जबाब नोंदवला. सरकारी वकील उदय मोहन कुलकर्णी यांनी केलेला युक्तिवाद, न्यायालयाने ग्राह्य मानत न्यायमूर्ती जी. बी. गुरव यांनी मिरजकर याला पाच वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Krw22b01838 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..