हर घर तिरंगा उपक्रमात सहभागी व्हा ः जाधव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हर घर तिरंगा उपक्रमात सहभागी व्हा ः जाधव
हर घर तिरंगा उपक्रमात सहभागी व्हा ः जाधव

हर घर तिरंगा उपक्रमात सहभागी व्हा ः जाधव

sakal_logo
By

‘हर घर तिरंगा’ उपक्रमात
सहभागी व्हा ः जाधव
कुरुंदवाड, ता. २९ ः १५ ऑगस्टला स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत शहरात दहा हजार ध्वज फडकावण्यात येणार आहेत. या उपक्रमात शहरवासीयांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी केले.
ते म्हणाले, ‘‘शहरात १० हजार तिरंगा फडकावण्याचा मानस आहे. जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील ज्ञात-अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे. देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी, या उद्देशाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १३ ते १५ ऑगस्टदरम्यान खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्थांच्या इमारतींवर, तसेच शहरातील ६ हजार मिळकतींवर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वज उभारणे अपेक्षित असून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी ‍उस्फूर्त प्रतिसाद द्यावा.’’

Web Title: Todays Latest Marathi News Krw22b01865 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top