बस्तवाडमध्ये सत्ताधारी, विरोधक आमनेसामने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बस्तवाडमध्ये सत्ताधारी, विरोधक आमनेसामने
बस्तवाडमध्ये सत्ताधारी, विरोधक आमनेसामने

बस्तवाडमध्ये सत्ताधारी, विरोधक आमनेसामने

sakal_logo
By

बस्तवाडमध्ये सत्ताधारी, विरोधक आमनेसामने
दोन्ही आघाड्यांकडून खातेनिहाय चौकशीची जिल्हा परिषदेकडे मागणी
कुरुंदवाड, ता. ५ ः बस्तवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीच्या कारभारात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार सत्तारूढ व विरोधी आघाड्यांनी केली आहे. खातेनिहाय चौकशीची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. दोन दिवसांपूर्वी विरोधी आघाडीचे जमीर पटेल व त्यांच्या सहकाऱ्‍यांनी सत्तारूढ आघाडीच्या कारभाराच्या चौकशीची, तर सत्तारूढ आघाडीच्या सरपंच प्रदीप पाटील यांनी यापूर्वीच्या सरपंच व कारभाऱ्‍यांनी त्यांच्या कार्यकाळात गैरकारभार केल्याचा आरोप करीत चौकशीची मागणी केली आहे.
विरोधी आघाडीचे जमीर पाटील यांच्या निवेदनातील आशय असा, ‘बस्तवाड (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीच्या विकासकामांच्या निधीबाबत माहितीच्या अधिकाराखाली मागणी केली असता सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे उत्तर दिले आहे. अपिल केल्यानंतर दप्तर तत्कालीन ग्रामसेवकांनी पूर्ण करण्यासाठी घेऊन गेल्याचे सांगत दिशाभूल केली आहे. निधीच्या प्रक्रियेची व मासिक सभेत झालेल्या कार्यवाहीची आणि शासकीय दप्तर परस्पर घरी घेऊन जाणे असे कोणत्या अधिनियमात आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.’ निवेदनावर जमीर पाटील, रफिक चमन मलिक, आण्णासो चौगुले, सुरेश ऐवाळे, अनिल उमराणे आदींच्या सह्या आहेत.
सत्तारुढ आघाडीतर्फे २०१६ ते २०२१ याकाळात तत्कालीन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी विकास निधीत भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे या कालावधीतील ग्रामपंचायतीची खातेनिहाय चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सरपंच प्रदीप चौगुले व ग्रामपंचायत सदस्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे दिल्या आहेत. निवेदनावर उपसरपंच बाळासो कोळी, ग्रा. पं. सदस्य श्रीशैल जंगम, कृष्णा कांबळे, सौ. आशा नाईक, शानाबाई लाटकर, सौ. किरण कांबळे, अम्माजान पाटील, संगीता कांबळे आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Krw22b01874 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top