हेरवाड ग्रामपंचायतीवर विधवांचा मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हेरवाड ग्रामपंचायतीवर विधवांचा मोर्चा
हेरवाड ग्रामपंचायतीवर विधवांचा मोर्चा

हेरवाड ग्रामपंचायतीवर विधवांचा मोर्चा

sakal_logo
By

हेरवाड ग्रामपंचायतीवर विधवांचा मोर्चा
कुरुंदवाड, ता. ११ ः विधवा प्रथा बंदीचा ऐतिहासिक ठराव करुन त्याची अंमलबजावणी करणाऱ्‍या हेरवाड (ता. शिरोळ) गावातील विधवा महिलांनी विधवा प्रथा बंदीचा ठराव केल्यानंतर आमदार, खासदार, शासनस्तरावरुन तसेच सामाजिक संस्थांकडून निधी देण्यात आला. तो गावातील विधवा महिलांना रोख स्वरुपात द्यावा यासह विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायतींवर मोर्चा काढून निदर्शने केली. आंदोलनाचे नेतृत्व जितेंद्र ठोंबरे यांनी केले. दरम्यान ग्राम विकास अधिकारी पी. के. कोळेकर आणि सरपंच सुरगोंडा पाटील या मागण्यांबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवून मार्गदर्शन घेऊ व पुढील कार्यवाही करु, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलक महिला शांत झाल्या. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी विधवांचा घरफाळा, पाणीपट्टी माफ करावी, ग्रामपंचायतीच्या वार्षिक अंदाजपत्रकातील तरतुद अपंगाप्रमाणे पाच टक्के निधी विधवा महिलांसाठी खर्च करावा अशा मागण्या केल्या. आंदोलन स्थळी कुरुंदवाड पोलिस ठाण्यातर्फे पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलनात जितेंद्र ठोंबरे, रिपब्लिकनचे स्वप्नील वाक्रुसे, हरिश्चंद्र कांबळे, अविनाश कांबळे, यांच्यासह गावातील विधवा महिला सहभागी झाल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Krw22b01887 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..