कुरुंदवाडला सेंद्रिय शेती कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुरुंदवाडला सेंद्रिय शेती कार्यशाळा
कुरुंदवाडला सेंद्रिय शेती कार्यशाळा

कुरुंदवाडला सेंद्रिय शेती कार्यशाळा

sakal_logo
By

कुरुंदवाडला सेंद्रिय शेती कार्यशाळा
कुरुंदवाड ः स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव अंतर्गत पंचायत समितीतर्फे ‘सेंद्रिय शेती कार्यशाळेचे’ आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी शंकर कवितके होते. तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, सहायक गटविकास अधिकारी सुरेश दानवाडकर, कृषी अधिकारी सौ. दीप्ती बावधनकर, सेंद्रिय शेती मार्गदर्शक सौ. अरुंधती संजय पाटील (रा. धरणगुत्ती) चवगोंडा सकाप्पा (रा. दानोळी) प्रमुख उपस्थित होते.
सौ. अरुंधती पाटील यांनी गांडूळ खत व दशपर्णी अर्क याबद्दल सविस्तर माहिती दिली. श्री. सकाप्पा यांनी सेंद्रिय भाजीपाला लागवड याबद्दल माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी यांनी पीक फेरपालट व शासकीय योजना यांची माहिती दिली. गटविकास अधिकारी कवितके यांनी सेंद्रिय शेतीबाबत उपस्थित शेतकऱ्यांना विविध उदाहरणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन कृषी विस्तार अधिकारी अनिकेत भिलवडे यांनी केले. आभार कृषी विस्तार अधिकारी भीमराव गोवंदे यांनी मानले. कृषि विस्तार अधिकारी राजेंद्र सिद्धन्नावर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Krw22b01891 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..