कुरुंदवाड परिसरात स्वातंत्र्यदिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुरुंदवाड परिसरात स्वातंत्र्यदिन
कुरुंदवाड परिसरात स्वातंत्र्यदिन

कुरुंदवाड परिसरात स्वातंत्र्यदिन

sakal_logo
By

कुरुंदवाड परिसर
कुरुंदवाड ः शहरात ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. शहरातील सार्वजनिक ध्वजवंदन एस. पी. हायस्कूल मैदानात पालिका प्रशासक निखिल जाधव यांच्याहस्ते केले. राष्ट्रीय छात्र सेनेचे कमांडिंग ऑफिसर बाबासाहेब भुजुगडे यांनी ध्वजाला सलामी दिली.
पालिकेत चतुर्थश्रेणी कर्मचारी विनायक दळवी, कृष्णा घाटावर पाणीपुरवठा अभियंता प्रदिप बोरगे, पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे, शाहू पतसंस्था किरण आलासे, माऊली महीला संस्था प्राजक्ता अनुप मधाळे, कुरुंदवाड अर्बन बँकेत बँकेचे अध्यक्ष अरुण आलासे यांनी ध्वजवंदन केले. नगरपरिषद, पोलिस ठाणे येथे आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. सकाळी साडेसात वाजता शहरातील एस. पी. हायस्कूल, साने गुरुजी विद्यालय, गर्ल्स हायस्कूल, वि. ख. माने कन्या माध्यमिक विद्यालय, डॉ. अल्लामा इक्बाल हायस्कूल, जि. प. प्राथमिक शाळांनी ध्वजवंदन करून शहरातून प्रभातफेरी काढली. फेरीमध्ये साने गुरुजी हायस्कूलने ‘हर विद्यार्थी झेंडा’ हातात घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने शहरातून प्रभातफेरी काढली. फेरीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. क्रीडांगणावर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी ध्वजाच्या रंगाचा पाण्याचा कारंजा केला होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी कृष्णा, पंचगंगा संगम घाटावर नद्यांना आलेल्या पुरामध्ये यांत्रिक बोटीमध्ये ध्वजाला सलामी दिली. माजी नगराध्यक्ष जयराम पाटील, रामचंद्र डांगे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विजय पाटील, राम मधाळे, राजमहमद बागवान, सुरेश बिंदगे, डॉ. के. एस. माने, महादेव बागलकोटे, अक्षय आलासे, सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे, पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Krw22b01893 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..